पुणे

राजपुरात टॅबच्या साहाय्याने अध्ययन

CD

भीमाशंकर, ता. १९ : राजपूर (ता. आंबेगाव) येथे आदर्श, मॉडेल शासकीय माध्यमिक आश्रमशाळा प्रशस्त व सर्वसुखसोयींनी युक्त आहे. नवीन तंत्रज्ञानासह डिजिटल बोर्ड, इंटरॅक्टिव पॅनल व टॅबच्या साहाय्याने आदिवासी विद्यार्थ्यांचे अध्यापन केले जाते.

आश्रमशाळा सन २०१३ मध्ये नव्याने बांधण्यात आली. शाळेला संरक्षक भिंत असल्याने पुरेसे संरक्षण होते आहे. सध्या शाळेत ३५९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेशेजारी दाट झाडी नाही. त्यामुळे जंगली श्वापदांपासून मुले सुरक्षित आहेत.

निवासी विद्यार्थी
१३८..... मुले
१५०..... मुली
७१.... अनिवासी
२........विनासवलत

दृष्टिक्षेपात
मुलांना व मुलींना स्वतंत्र वसतिगृह
झोपण्यासाठी स्वतंत्र बंक बेड
पहारेकरी पुरुष व महिला कर्मचारी
पूर्ण वेळ वैद्यकीय सेवेसाठी परिचारिका
विद्यार्थ्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी

आश्रमशाळेतील सोयी-सुविधांबाबत कोणतीच अडचण नसून आमच्या मुलांची उत्तम काळजी घेतली जाते. नाश्ता – जेवण वेळच्या वेळी दिले जात असून आंघोळीसाठी गरम पाणी देण्यात येते.
- लहू धराडे, पालक

मुलींसाठी सुरक्षितता, आरोग्य व शैक्षणिकदृष्ट्या आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. आंघोळीसाठी पुरेसे गरम पाणी आहे. सिक रूमसोबत स्वतंत्र पिंक रूम उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- साधना भेके, पदवीधर प्राथमिक शिक्षिका

शाळा व वसतिगृहाच्या सभोवतालचा परिसर स्वच्छ आहे. शालेय परिसर व वसतिगृहाची नियमित स्वच्छता राखली जाते. रात्रीच्या वेळेस आवारात पुरेशी विजेची व्यवस्था आहे. मध्यवर्ती स्वयंपाकगृहातून सकस आहार पुरविला जातो. तसेच आजारी विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेतली जाते. शाळेत व वसतिगृहात पिण्यासाठी पुरेसे आर.ओ.चे स्वच्छ पाणी असते.
- लक्ष्मण देवकर, मुख्याध्यापक

05526

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Blood Donation Rules : रक्तदान शिबिरांबाबत आयुक्त तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय!

Manoj Jarange On Farmer Relief : "५ हजारांसाठी शेतकऱ्यांनी बँकेच्या रांगेत मरायचं का?"; मनोज जरांगेंचा सरकारवर थेट हल्लाबोल, म्हणाले...

Latest Marathi News Update: कॅफेबाहेर खुनाचा प्रयत्न करून पसार झालेल्या आरोपीला अटक

Social Media Backlash : "व्ह्यूजसाठी इतक्या खालच्या पातळीला..."; पत्नीला पाळीव कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजले, यूट्यूबर सौरभ जोशीवर नेटकरी भडकले!

Jailer 2 Movie Review : रजनीकांतच्या 'जेलर २'चा प्रेक्षकांवर प्रभाव कसा? वाचा रिव्ह्यू

SCROLL FOR NEXT