bhimsen joshi Birth Centenary Music Festival over pune  sakal
पुणे

पं. भीमसेन जोशी जन्मशताब्दी संगीत महोत्सवाचा समारोप

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संतूर वादक पं. शिवकुमार शर्मा यांना श्रद्धांजली

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सतारवादन, कथक नृत्य आणि शास्त्रीय गायनाच्या बहारदार सादरीकरणाने महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ‘भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जन्मशताब्दी संगीत महोत्सवा'चा मंगळवारी समारोप झाला. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला संतूर वादक पं. शिवकुमार शर्मा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

महोत्सवाचा दुसर्‍या दिवशीचा प्रारंभ विलायत खानी घराण्याचे पं. मारुती पाटील यांच्या सतारवादनाने झाला. राग मारवाने त्यांनी वादनाला सुरुवात केली. त्यांना तबल्यावर चारुदत्त फडके यांनी तर तानपुऱ्यावर धनश्री भडकमकर यांनी साथ दिली. त्यानंतर कथक नृत्यांगना शर्वरी जमेनीस आणि समूहाने नृत्य सादर केले. त्यांना तबल्यावर निखिल फाटक, संवादिनीवर यशवंत थिटे आणि पढंतची साथ जुई सगदेव यांनी दिली.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ​किराणा घराण्याचे गायक आणि पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य पं. आनंद भाटे यांचे सादरीकरण झाले. राग शुद्धकेदारने त्यांनी गायनाला सुरुवात केली. त्यानंतर 'केतकी गुलाब जुई चंपक बन फुले' ही रचना आणि पं. भीमसेन जोशी यांनी गायलेल्या इतर काही रचना सादर केल्या. त्यांना तबल्यावर भरत कामत, संवादिनीवर निरंजन लेले आणि तानपुऱ्यावर ईश्वरी श्रीगार यांनी साथ दिली. कार्यक्रमाचे निवेदन नेहा परांजपे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT