Bhimthadi Jatra Sakal
पुणे

Bhimthadi Jatra : भीमथडी जत्रेत यंदा साडेचार कोटींची उलाढाल; १ लाख पुणेकरांची हजेरी

पाच दिवसांपासून सुरू असलेल्या भीमथडी जत्रेचा सोमवारी (ता.२५) समारोप झाला. यंदाच्या भीमथडी जत्रेला सुमारे १ लाख पुणेकरांनी भेट दिली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सिंचनगर येथील मैदानात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या भीमथडी जत्रेचा सोमवारी (ता.२५) समारोप झाला. यंदाच्या भीमथडी जत्रेला सुमारे १ लाख पुणेकरांनी भेट दिली. या जत्रेत पाच दिवसांत ४ कोटी ६० लाख रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या जत्रेला हजेरी लावणाऱ्या पुणेकरांच्या संख्येत सुमारे २० हजारांनी तर, आर्थिक उलाढालीत १ कोटी १० लाख रुपयांची वाढ झाली आहे.

बारामती येथील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, शारदा महिला संघ, भीमथडी फाउंडेशन आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने २१ ते २५ डिसेंबर या कालावधीत यंदाची भीमथडी जत्रा आयोजित करण्यात आली होती. यंदाच्या या जत्रेत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हजेरी लावणाऱ्या नागरिकांच्या संख्येत आणि आर्थिक उलाढालीत मोठी वाढ झाली असल्याचे या जत्रेच्या आयोजिका सुनंदा पवार यांनी सांगितले.

या जत्रेत महिला बचत गट, उद्योजिका, शेतकरी महिला, शेतकरी बचत गट आणि विविध कारागिरांचे मिळून ३२१ स्टॉल्स लावण्यात आले होते. जत्रेत स्वयंसिद्धा दालन, पॅकिंग विभाग व खाद्य विभाग अशी विविध प्रकारची दालने उभारण्यात आली होती.

खासदार शरद पवार यांची भेट

दरम्यान, राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी सोमवारी (ता.२५) सकाळी भीमथडी जत्रेला भेट दिली. यावेळी त्यांनी जत्रेतील विविध स्टॉल्सला भेट देऊन बचत गटांच्या महिलांशी संवाद साधला. भीमथडी जत्रेने यंदा १७ वर्षे पूर्ण केली असून, आतापर्यंत या जत्रेच्या माध्यमातून हजारो महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत. यामुळे अनेक महिला स्वतःच्या व्यवसायातून अन्य महिलांच्या हाताला काम देत आहेत.

भीमथडी जत्रेच्या या यशात आयोजिका सुनंदा पवार आणि त्यांच्या सर्व टीमचे योगदान पाहता ,हे काम अन्य प्रदर्शनासाठी मोलाचे मार्गदर्शक ठरणारे असल्याचे मत शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू पी.जी.पाटील, आयोजिका सुनंदा पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

SCROLL FOR NEXT