पुणे

पाटण, काऊदरा निसर्ग पूजा

CD

भंडारा- गुलालाची उधळण करत काऊदऱ्यात निसर्गपूजा

जानाईदेवीच्या नावानं चांगभलंचा गजर; निसर्गप्रेमी, भाविकांची उपस्थिती

पाटण, ता. २४ ः वनसंपत्तीचे जतन व संवर्धन करा, असा संदेश देत राज्यात सुख-शांती नांदावी, यासाठी निसर्ग संपदेला जेजुरी खंडोबाचा भंडारा व निवकणेच्या जानाईदेवीचा गुलाल, श्रीफळ अर्पण करून जेजुरीतील मार्तंड जानाईदेवीच्या हजारो भाविकांसह तालुक्यातील भक्तांनी मणदुरे येथील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या जळवखिंडीजवळील काऊदऱ्यावर आज सकाळी निसर्गपूजेचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी जानाईदेवीच्या नावानं चांगभलंच्या गजरात निसर्गप्रेमी व भाविकांनी कड्यावरून गुलाल-भंडाऱ्याची उधळण करत निसर्गाला श्रीफळ अर्पण केला.
दरम्यान, यावेळी भाजपचे युवा नेते याज्ञसेन पाटणकर, पंचायत समितीचे सदस्य शंकरराव घाडगे, मनसेचे तालुकाध्यक्ष गोरख नारकर यांनी या पूजेत सहभागी होऊन गुलाल, भंडाऱ्याची उधळण करत निसर्गपूजा केली.
निसर्गातील पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, मोठ्या प्रमाणावर होणारी जंगलतोड रोखली
जावी, परिसरातील निसर्ग सौंदर्य टिकून राहण्यासाठी वृक्ष संवर्धनासाठी आवाहन करत प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही जेजुरी येथील ग्रामस्थांनी राज्याला जागृतीचा अनोखा संदेश देणारी निसर्गपूजा हजारो भक्तांच्या उपस्थितीत जानाईदेवी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने केली. डोंगरपठारावर जेजुरी येथून हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत मार्तंड पालखीचे आगमन झाल्यानंतर जानाईदेवी पालखी पदयात्रा अन्नदान सेवा ट्रस्टच्या वतीने अन्नदान केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते परिसरातील महिलांना वनदेवी मानून साडी-चोळी वाटप केली. त्यानंतर परडी पूजन व आरती झाली. जेजुरीच्या पालखीचे निवकणेच्या दिशेने प्रस्थान झाले. काऊदऱ्यावरील सोहळा पार पडल्यानंतर डोंगरपठारावर स्वच्छता मोहीम राबवून प्लॅस्टिकची होळी केली.
जेजुरी येथून दर वर्षी पायी चालत जानाईदेवीच्या मंदिरापर्यंत पालखी येते. जेजुरी, पुणे जिल्ह्यासह मुंबईपर्यंतचे हजारो भाविक निवकणेच्या जानाईदेवीच्या यात्रेत सहभागी होतात. निसर्गपूजेनंतर पालखीचे निवकणे येथील जानाईदेवी मंदिराकडे पायवाटेने प्रस्थान झाले. निवकणे येथे पालखीचा तीन दिवस मुक्काम असून, अन्नदान सेवा ट्रस्टच्या वतीने तेथे येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद व अन्नदान केले जाते. यंदा पालखीचे २७ वे वर्षे आहे. पालखी पुन्हा जेजुरीला पोचेपर्यंतच्या कालावधीत व त्यानंतर हाेळी सणानंतरचा मंगळवार, शुक्रवार यादिवशी पंचक्रोशीतील लोकांना बोळवणीचे जेवण दिले जाते. काउदऱ्यावर साजरी करण्यात येणारी निसर्गपूजा व अन्नदान करण्याचा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. प्रतिवर्षी यात सातत्य राखले जाते. संपूर्ण पदयात्रेचे ट्रस्टमार्फत व्यवस्थापन केले जाते. यावेळी जानाईदेवी अन्नदान सेवा ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र बारबाई, अध्यक्ष शिवाजी कुतवळ, निसर्ग पूजेचे प्रवर्तक विजयकुमार हरिश्‍चंद्रे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. निसर्गपूजेच्या कार्यक्रमास पाटणसह परिसर व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

..........
A01233
काऊदरा (मणदुरे) ः भंडारा व गुलालाची उधळण करत निसर्गपूजा करताना भाविक.
.......................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: 'व्हीएसआर'च्या विमान उड्डाणांवर बंदी; बारामती विमान अपघात प्रकरणी DGCAची मोठी कारवाई

Pune Crime : बारावीचा पेपर संपताच कोथरूडमध्ये विद्यार्थ्यावर कोयत्याने वार; दोन अल्पवयीन ताब्यात

Fruit Drink Maaza: 'माझा'च्या छोटा पॅकमध्ये आढळली घाण; ११ वर्षीय मुलाची प्रकृती बिघडली

Kukadi Project : कुकडी प्रकल्पातून उन्हाळी पहिल्या आवर्तनात 7.6 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय

Katraj Accident : कात्रज बोगद्याजवळ दरीपुलावर अपघातात ट्रक चालक ठार, सातजण जखमी

SCROLL FOR NEXT