lock down 
पुणे

भोरच्या व्यापाऱ्यांनी मोडला आदेश, तरीही प्रशासन खूष 

विजय जाधव

भोर (पुणे) : लॉकडाउनच्या काळात सरकारने दुकाने उघडण्यासाठी सकाळी 7 ते सायंकाळी 7, अशी 12 तासांची परवानगी दिली असली, तरीही भोरमधील सर्व दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेतच उघडण्यात येणार आहेत. भोर शहरातील विविध व्यापारी संघटनांनी सर्व दुकाने केवळ पाचच तास उघडी ठेवण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. 

भोर शहर किराणा व भुसार व्यापारी असोसिएशन, सराफ असोसिएशन, युवा व्यापारी संघटना आणि कापड व्यापारी संघटना आदींनी आपापल्या संघटनांची बैठक घेऊन हा निर्णय घेतला आहे. सध्या लॉकडाउनमुळे यात्रा, लग्नसराई, रामनवमी उत्सव बंद झाले असल्याने नागरिकांच्याही मनाची काहीशी तयारी झाली आहे. सरकारने परवानगी दिली असली, तरीही पुण्या- मुंबईतील "रेड झोन' मधील आणि बॅंका व इतर शासकीय कार्यालयातील कर्मचारीही पुण्याहून ये- जा करीत आहेत. याशिवाय बाहेरून तालुक्‍यात आलेले कित्येक जण काहीही काम नसले तरीही शहरात विनाकारण फिरतात. त्यामुळे कोरोनाचा धोका संपलेला नाही. त्यामुळे व्यापारी संघटनांनी सकाळी 9 ते दुपारी 2, या वेळेतच दुकाने उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

प्रांताधिकाऱ्यांनी विविध प्रकारच्या दुकानांसाठी ठरवून दिलेल्या दिवशीच दुकाने उघडणार आणि तीही 9 ते 2 या वेळेतच सुरू ठेवणार असल्याचे भोर शहर किराणा व भुसार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष महेश धरू, सराफ असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र ओसवाल, युवा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अमर ओसवाल आणि कापड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बंडूशेठ गुजराथी यांनी सांगितले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  

प्रशासनाकडून व्यापाऱ्यांचे स्वागत 
शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने 9 ते 2 या वेळेतच उघडी ठेवण्याच्या निर्णयाचे तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीचे इन्सिडंड कमांडर तथा प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी स्वागत केले आहे. व्यापाऱ्यांनी घेतलेला निर्णय हा स्वागतार्ह असून, यामुळे शहर आणि तालुक्‍यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होणार असल्याचे राजेंद्रकुमार जाधव यांनी सांगितले. तसेच, नागरिकांनी अत्यावश्‍यक काम असेल तरच शहरात यावे, अन्यथा घरातच बसावे, असेही जाधव यांनी नमूद केले.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kisan Credit Card Rule: किसान क्रेडिट कार्डचे नियम बदलले! शेतकऱ्यांना आता सहज कर्ज मिळणार; कागदपत्रांची कटकट कमी, RBI चा मोठा निर्णय

IND vs AFG, 3rd ODI: प्रसिद्ध कृष्णाच्या ५ विकेट्स, पण अफगाणिस्तानचा कर्णधार एकटा लढला अन् शतकासह भारतासमोर उभं केलं लक्ष्य

Omraje Nimbalkar: उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरेंबद्दल ओमराजे पहिल्यांदाच बोलले; कोर्टाच्या निकालावरही दिली प्रतिक्रिया

Udgir News : मुंबई–लातूर–बिदर सुपरफास्टला तीन अतिरिक्त डबे; १७२ अतिरिक्त प्रवाशांना लाभ

Maharashtra Weather: मेघगर्जनेसह उष्णतेचा इशारा! राज्यातील 'या' जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार; हवामान विभागाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT