Encroachment sakal
पुणे

Encroachment : भोर नगरपालिकेकडून अतीक्रमण धारकांवर कारवाई

भोर नगरपालिका प्रशासनाने शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांवरील अतीक्रमणांवर कारवाई करून अतीक्रमणे काढून टाकली.

विजय जाधव

भोर (पुणे) - नगरपालिका प्रशासनाने शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांवरील अतीक्रमणांवर कारवाई करून अतीक्रमणे काढून टाकली. गुरुवारी (ता.३०) नगरपालिका प्रशासनाने दिवसभरात पोलिस बंदोबस्तात दोन जेसीबी, ट्रॅक्टर आणि कर्मचा-यांच्या मदतीने ही कारवाई केली.

दोन महिन्यापासून नगरपालिका प्रशासनाने मुख्य रस्त्यांवर अतीक्रमण करणा-या १३९ जणांना नोटीसा दिलेल्या होत्या. तीन वेळी कारवाई करण्याचे नियोजन केले होते. परंतु काही कारणास्तव अतीक्रमणे काढण्याची कारवाई स्थगीत करावी लागली. मात्र मुख्याधिकारी हेमंत किरुळकर आणि बांधकाम विभाग प्रमुख अभिजीत सोनवले यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी ही कारवाई करण्यात आली.

एसटी स्टँड ते राजवाडा चौक आणि सुभाष चौक (काळा गणपती) ते नगरपालिका चौक या मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा असलेली अतिक्रमणे काढण्यात आली. या मार्गावरील व्यावसायीकांनी गटारांच्या वर बांधकामे करून आणि मुख्य रस्यावर अतीक्रमण करून सामान विक्रीसाठी ठेवले होते. काही व्यावसायीकांनी तर पक्के बांधकामही केलेले होते. त्यामुळे तीन ठिकाणच्या व्यावसायीकांनी अतीक्रमणे काढण्यास विरोध केला होता.

परंतु नगरपालिका प्रशासनाने कडक भूमीका घेत सरसकट अतीक्रमणे काढली. अतीक्रमणे काढल्यामुळे मुख्य रस्ता हा ९ मीटरचा झालेला आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नगरपालिकेच्या पथकामध्ये पवन भागणे, महेंद्र बांदल, महादेव बोडके, ज्ञानेश्वर मोहिते, अर्चना पवार, दिलीप भारंबे, अमोल मळेकर, राजेद्र राऊत, दत्तात्रय जगताप, स्वाती होले, संगिता बोराडे व स्मिता गोडबोले आदींसह ३० कर्मचा-याचा समावेश होता.

गुरुवारी अतीक्रमणांवर कारवाई केल्यानंतर व्यावसायीक पुन्हा अतीक्रमण करून परिस्थिती जैसे थे करतात. यासाठी नगरपालिका प्रशासन शुक्रवारपासून नियमीतपणे कारवाई करणार असल्याचे नगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

याशिवाय एसटी स्टँड ते सुभाष चौक या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला फळवाले व फेरीवालेही स्टॉल्स टाकून अतीक्रमण करतात. त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. नगरपालिकेच्या कारवाईमुळे भोरवासीयांनी प्रशासनाचे कौतुक करीत कारवाई निरंतर सुरु ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली.

शहरातील अतीक्रमधारकांवरील कारवाई ही नियमीतपणे सुरुच राहणार आहे. यापुढे अवैध बांधकांमांवरही टप्याटप्याने कारवाई केली जाणार आहे. तसेच शहरातील मुख्य रस्त्यावरील ड्रेनेजचे आणि रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम केले जाणार आहे. त्यानंतर या मार्गावरील अतीक्रमणाचा प्रश्न कायमस्वरुपी बंद होणार आहे.

- हेमंत किरुळकर, मुख्याधिकारी भोर नगरपालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Rule From 1 August: 1 ऑगस्टपासून बदलणार अनेक नियम! LPG, रेल्वे तिकीट, बँकिंगसह 'हे' 5 मोठे बदल जाणून घ्या

IND vs SL Test : जसप्रीत बुमराह श्रीलंका दौऱ्याला मुकणार? प्रमुख गोलंदाजाचा फिटनेस अहवाल आला समोर; नेमकं काय आहे त्यात?

महिलेच्या प्रायव्हेट पार्टवर व्हायब्रेटर ठेवणं, हा बलात्कारच! केरळ उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, आरोपीची शिक्षा कायम...

Thane News: ठाण्यात नवं प्राणिसंग्रहालय उभारणार, १० कोटी रुपयांची तरतूद, राज्य सरकारचा निर्णय; कसा असेल प्रकल्प?

Latest Marathi News Live Update : जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतील सप्तकुंड धबधबा प्रवाहित

SCROLL FOR NEXT