पुणे

भोर, राजगडमध्ये आठ मतदान केंद्र

CD

भोर, ता. २१ : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील मतदानासाठी भोर आणि राजगड तालुक्यात आठ मतदान केंद्र उभारण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी दिली. यापैकी भोर तालुक्यात सहा आणि राजगड तालुक्यात दोन मतदान केंद्रे आहेत.
भोर शहरातील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात व नसरापूर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पदवीधर मतदान केंद्रासाठी प्रत्येकी दोन आणि शिक्षक मतदानासाठी एक, असे एकूण सहा मतदान केंद्रे आहेत. तर, राजगड तालुक्यासाठी विंझर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पदवीधर मतदानसाठी एक आणि शिक्षक मतदानसाठी एक, असे एकूण दोन मतदान केंद्र आहेत. भोर आणि राजगड तालुक्यासाठी मिळून पदवीधर मतदार संघासाठी १ हजार ६५४ पुरुष आणि ७५३ महिला, असे एकूण २ हजार ४०७ मतदार आहेत. तर, शिक्षक मतदार संघासाठी २६३ पुरुष आणि १५० महिला असे एकूण ४१३ मतदार आहेत.
आठ मतदान केंद्रांवर ५६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, ३ झोनल ऑफिसर्स नेमण्यात आलेले आहेत. मतपेट्या आणि कर्मचाऱ्यांना मतदान केंद्र सळी नेण्यासाठी व आणण्यासाठी एक एसटी बस आणि तीन जीपची सोय करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी आठ ते चार या वेळेत मतदान होणार आहे. मतदानासाठी मतदाराकडे ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk: अंतराळात डेटा सेंटर, जमिनीवर एआयचा विस्तार! काय आहे एलॉन मस्क यांचा जगाला धडकी भरविणारा मास्टर प्लॅन?

आमचे हात बांधलेले नाहीत, निवडणूक प्रक्रियेत गडबड केल्यास शांत बसणार नाही, सर्वोच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी!

Soybean Farm Fire : दुष्काळात कष्टाने जगवलेले पाच एकरवरील सोयाबीन जळून खाक; जाणीवपूर्वक आग लावल्याचा शेतकऱ्याचा संशय

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

अमरावतीत पोलीस शिपायाच्या मृत्यूने खळबळ; टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी लिहिली चिठ्ठी, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT