corona 
पुणे

भोर तालुका पुन्हा कोरोनामुक्त, तर दौंडमध्ये आजीनंतर नातू कोरोनाबाधित 

प्रफुल्ल भंडारी / विजय जाधव

पुणे :  भोर तालुका पुन्हा एकदा कोरोनामुक्त झाला असून, तालुक्यातील १२ पॉझिटीव्ह असलेल्या सर्व रुग्णांच्या तपासण्या निगेटीव्ह आल्या आहेत. तर, मुंबईवरून दौंड शहरात आलेल्या एका आजीला कोरोना विषाणूची बाधा झाल्याच्या दोन दिवसानंतर तिच्या नातवाला देखील कोरोनाची बाधा झाली आहे. 

दौंड : मुंबई वरून दौंड शहरात आलेल्या एका आजीला कोरोना विषाणूची बाधा झाल्याच्या दोन दिवसानंतर तिच्या नातवाला देखील कोरोनाची बाधा झाली आहे. 

दौंड- सिध्दटेक रस्त्यावरील श्री सिंधी धर्मशाळेसमोरील रेल्वे कामगार मैदानाच्या रस्त्यालगत एका इमारतीमध्ये मुंबई येथील एक कुटुंब नातेवाईकांकडे आले आहेत. त्यापैकी ४ जून रोजी ७६ वर्षीय महिलेस कोरोनाची बाधा झाली. त्यांच्या संपर्कातील नऊ जणांच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी (स्वॅब टेस्ट) पाठविले असता त्याचा अहवाल आज (ता. ६) आला आहे. नऊ जणांपैकी आजीचा नातू असलेल्या ४२ वर्षीय तरूणास कोरोनाची बाधा झाली असून उर्वरित आठ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

दरम्यान, १ जून रोजी ४५ वर्षीय कोरोनाबाधित तरूणाच्या अंत्ययात्रेसाठी गेलेल्या १५० पेक्षा अधिक लोकांपैकी उप जिल्हा रूग्णालयाच्या वतीने ३ जून रोजी ४८ जणांचे घशातील द्रव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्या सर्व ४८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती उप जिल्हारूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॅा. संग्राम डांगे यांनी दिली. दौंड तालुक्यात २९ एप्रिल ते ६ जून या कालावधीत एकूण ५५ जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली असून त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४७ जण बरे झाले आहेत. 

दौंड शहरातील दौंड - सिध्दटेक रस्त्यालगत असलेल्या गवळीवाडा, गोवा गल्ली शेजारील भाग, पंडीत नेहरू चौक, तुकाई नगर, सिंधी गल्ली व रेल्वे कामगार मैदान रस्ता या परिसरात १६ मे ते ६ जून दरम्यान ११ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी गोवा गल्ली शेजारील भागातील ७० वर्षीय नागरिक, पंडीत नेहरू चौकातील ९० वर्षीय महिला, तुकाईनगर येथील ६१ वर्षीय महिला व सिंधी गल्ली येथील ४५ वर्षीय तरूण, असे एकूण चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

भोर : भोर तालुका पुन्हा एकदा कोरोनामुक्त झाला असून, तालुक्यातील १२ पॉझिटीव्ह असलेल्या सर्व रुग्णांच्या तपासण्या निगेटीव्ह आल्या आहेत, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांच क-हाळे यांनी दिली.

भोर तालुक्यात २६ मे रोजी पॉझिटिव्ह असलेले रायरीतील ६, मानकरवाडीतील ३, धारांबेवाडीतील २ आणि वरोडी खुर्दमधील १ या रुग्णांच्या सर्व चाचण्या निगेटीव्ह आल्या. या सर्वांना शनिवारी (ता.६) सायंकाळी घरी सोडण्यात आले. त्यामुळे तालुक्यात संख्या एकही रुग्ण कोरोनाग्रस्त नाही. याशिवाय शनिवारी तालुक्यातील आणखी ११ जणांचे अहवाल चाचणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत. यामध्ये मांढर (ता. पुरंदर) येथील कोरोनाग्रस्ताच्या अंत्यविधीसाठी गेलेले जांभळीतील ५, तांभाड, भोंगवली व कामथडी येथील प्रत्येक १ जणाचा समावेश आहे.  मुंबईहून वडगाव डाळ व साळवडे येथील प्रत्येकी १ अशा एकूण ११ जणांचे रिपोर्ट कोरोनाच्या चाचणीसाठी पाठविले आहेत. त्यांचा रिपोर्ट सोमवारी (ता.८) येण्याची अपेक्षा आहे. परंतु, तोपर्यंत तरी तालुका कोरोनामुक्त झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT