पुणे

दुष्काळाची २० हजार शेतकऱ्यांना झळ

CD

भोर, ता. २४ : भोर तालुक्यामधील खरीप हंगामात २० हजार ४२२ शेतकऱ्यांच्या १० हजार ४९६ हेक्टर क्षेत्राला दुष्काळाची झळ बसली आहे. नुकसान भरपाईसाठी शासनाकडून नऊ कोटी ७६ लाख ३ हजार ५०० रुपयांचा निधी अपेक्षित आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी शरद धर्माधिकारी यांनी दिली.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार तालुका प्रशासनाकडून तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. शासनाचे महसूल विभाग, पंचायत समिती आणि कृषी विभागामार्फत हे पंचनामे पूर्ण झाले आहेत. खरीप हंगामात १६ हजार ४४६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली होती. त्यापैकी १० हजार ४९६ हेक्टर क्षेत्राला दुष्काळाचा फटका बसला आहे. सर्वाधिक फटका हा जिरायती क्षेत्रातील भात, सोयाबीन, भुईमूग, नाचणी व मका आदी पिकांना बसला आहे. १८ हजार ७५६ शेतकऱ्यांची नऊ हजार ७९२ हेक्टर क्षेत्रावरील जिरायती पिके बाधित झाली आहेत. त्याखालोखाल ८९० शेतकऱ्यांची २६७ हेक्टर बागायती क्षेत्रातील ऊस, भाजीपाला व फूलपिकांचे नुकसान झाले आहे. तर ७७६ शेतकऱ्यांचे आंबा, पेरू व अंजीर या फळपिकांचे ४३७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. असे एकूण १० हजार ४९६ हेक्टर क्षेत्र दुष्काळाने बाधित झाले आहे. राज्य शासनाच्या २०२३ सालच्या आदेशानुसार तालुक्यातील २० हजार ४२२ शेतकऱ्यांना ९ कोटी ७६ लाख ३ हजार ५०० रुपयांचा निधी मिळण्याची अपेक्षा आहे.

पीक व्यवस्थापन तंत्राची माहिती
दुष्काळसदृश परिस्थितीत कृषी विभागाकडून आगामी रब्बी हंगामातील मका व चारा पिकांच्या व्यवस्थापनासाठी
शेतकऱ्यांमध्ये ऑनलाईन वेबिनारद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी भागांमधील शेतकऱ्यांना चारा पिकांचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रचार व प्रसार करण्यासोबत पीक व्यवस्थापन तंत्र आणि उत्पादन वाढविण्यासाठी उपाययोजनांची माहिती देणार आहेत.

६३४.४० क्विंटल ज्वारीचे बियाणे देणार
कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषण उपअभियान पौष्टिक तृणधान्य (रब्बी ज्वारी)२०२६-२७ उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील १५ हजार ८६० शेतकऱ्यांना ज्वारी बियाण्यांचे मिनी कीट देण्यात येणार आहे. यामध्ये ऑनलाईन प्रथम क्रमांकाने अर्ज केलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रत्येकी चार किलोप्रमाणे ६३४.४० क्विंटल ज्वारीचे बियाणे देण्यात येणार आहे. ज्वारी बियाणे मिनी कीटसाठी शेतकऱ्यांनी शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे, असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुहेरी हत्याकांडानं यवतमाळ हादरलं! जगत मंदिर परिसरात रक्तरंजित थरार नेमका कसा घडला?

Murlidhar Mohol : राज्यातील सहकार चळवळ देशाला मार्गदर्शक; केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Prithviraj Chavan : मनोज जरांगे-पाटलांचे नेतृत्व संपवायचे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव

Pakistan Crisis: बापरे! पाकिस्तानात एका गॅस सिलिंडरची किंमत पोहचली ७ हजारांवर; कारण काय?

Sukanya Samruddhi Yojna : घरात तीन मुली आहेत? मग टेन्शन सोडा; जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांतर्गत कशी उभी राहील कोटींची संपत्ती!

SCROLL FOR NEXT