पुणे

फांद्यांऐवजी पुरातन झाडांवर कुऱ्हाड

CD

भोर, ता. ३ : भोर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी झाडांच्या फांद्या तोडण्याची परवानगी दिली असताना नगरपालिकेच्या वृक्ष विभागाने सुमारे १५० वर्षांपूर्वीची चार झाडे पूर्णपणे तोडून टाकली. यामुळे नागरिकांनी नगरपालिकेच्या प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. संबंधित कर्मचारी आणि ठेकेदार यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शाळा क्रमांक २ च्या आवारातील गुरुवारी (ता. ३) झाड तोडताना स्थानिकांनी त्यांना विरोध केला. मात्र विरोध झुगारून कामगारांनी झाडाची एक बाजू खोडापर्यंत तोडली. आगामी कृष्ण जन्माष्टमी आणि गणेशोत्सवात नागरिकांना अडचण होऊ नये यासाठी नगरपालिकेने रस्त्यामध्ये आलेल्या धोकादायक झाडांच्या फांद्या तोडाव्यात, असा ठराव सर्वसाधारण सभेत करण्यात आला होता. दरम्यान, नगरपालिकेच्या राष्ट्रसंत गाडगेबाबा प्राथमिक विद्यालय शाळा क्रमांक २ च्या शालेय प्रशासनाने आवारातील झाडांच्या फांद्या तोडण्याची विनंती नगरपालिकेला केली. त्यामुळे मुख्याधिकारी गजानन शिंदे यांनी अडथळा होणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्याचे आदेश दिले. मात्र, वृक्ष विभागाने नागरिकांना पूर्वसूचना न देता आणि कोणत्याही सुरक्षिततेचा विचार न करता मनमानी करून झाडे पूर्णपणे तोडली.
दरम्यान, गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास अर्धवट तोडलेले झाड कर्मचाऱ्यांनी पुन्हा तोडले. मात्र झाड रस्त्याच्या कडेला असलेल्या अनधिकृत टपऱ्यांवर पडल्यामुळे टपऱ्या उद्‌ध्वस्त झाल्या. यावेळी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. शाळा क्रमांक २ पासून १०० मीटर अंतरावर असलेल्या एका खासगी जागेतीलही सुमारे दीडशे वर्षांपूर्वीची दोन झाडे परवानगीशिवाय तोडली. याबाबत कोणतीही माहिती नगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली नाही.

भोर नगरपालिकेने शाळा क्रमांक २ च्या आवारातील अडथळा होणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्याची परवानगी दिली आहे. मात्र जर झाडे पूर्णपणे तोडली असतील तर संबंधित कंत्राटदार आणि नगरपालिकेचे कर्मचारी यांच्यावर वृक्ष अधिनियम १९७५ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
- गजानन शिंदे, मुख्याधिकारी, भोर नगरपालिका

07155

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates: पोलीस संरक्षणात विद्यानंद बापट निवासस्थानी पोहोचले

CJPवर गंभीर आरोप करत बनवली नवी पार्टी, CJP-Dची घोषणा; दीपकेच्या घराबाहेर केलेलं आंदोलन

दुचाकीधारकांना दररोज कमाईची संधी, केंद्रीय मंत्री गडकरींनी दिली मोठी माहिती; ड्रायव्हिंग लायसनबाबतही नवा नियम

तब्बल ९२ किलोची होती जान्हवी किल्लेकर; प्रेग्नन्सीनंतर घटवले ४३ किलो पण कसे? म्हणाली, 'मी धावायला जायचे पण...

Yuzvendra Chahal ची जादूई डिलिव्हरी अन् बेन स्टोक्स थेट क्लिन-बोल्ड! फिरकीच्या जाळ्यात कसा अडकला, पाहा Viral Video

SCROLL FOR NEXT