पुणे

भोर तालुक्यात चोऱ्यांचे सत्र

CD

भोर, ता. २५ : या महिन्यात भोर तालुक्यातील भोर शहर, महुडे, कापुहोळ, वेळू आणि खेड-शिवापूर येथे घरफोडी, चोरी आणि लुटीच्या घटना घडल्या आहेत. याशिवाय विद्युत मोटारी आणि रोहित्र फोडण्याचे प्रकारही सुरू आहेत. चोरीच्या गुन्ह्यात रोख रकमेसह, सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान व जीवनावश्यक वस्तूंची चोरी झालेली आहे. बंद घरे व फ्लॅटबरोबर, मॉल आणि सोन्याच्या दुकानांवरही चोरट्यांनी डल्ला मारला आहे. दरम्यान, चोरींच्या घटनांमध्ये वाढ होत असून नागरिकांनी सतर्क राहून सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
आगामी काळात मांढर (ता. वाई, जि. सातारा) येथील श्री काळूबाई देवीची (मांढरदेवीची) यात्रा सुरु होणार आहे. त्यावेळी भोर परिसरात चोऱ्यांच्या घटनांत वाढ होते. शिवाय पुढील काही महिन्यांत दुष्काळामुळे महागाई वाढल्यानंतरही चोरीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. चोरीच्या या घटनांमुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवली असून महत्वाच्या ठिकाणी तपासणी नाके उभारले आहेत. नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, बाहेर जाताना शेजाऱ्यांना कल्पना द्यावी, सोन्या-चांदीचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावेत, गावात येणाऱ्या-जाणाऱ्यांकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

चोरीच्या गुन्ह्यात वाढ होऊ नये यासाठी पोलिसांनी कार्यवाही सुरु केली असून संबंधित पोलिस ठाणे व गावातील पोलिस पाटील यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र नागरिकांनी व व्यावसायिकांनी सीसीटीव्ही बसवावेत, काही शंकास्पद गोष्टी आढळल्यास त्वरित जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा आणि पोलिसांना सहकार्य करावे.
- राजेंद्रसिंह गौर, पोलिस उपअधीक्षक, भोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Alert : चक्रीवादळाने रौद्ररूप धरले! ताशी १०० किमी वेगाने सुटणार सोसाट्याचा वारा; 'या' राज्यांत मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात काय घडणार?

फ्लिपकार्टच्या गोदामातून ९८० सॅमसंग मोबाईल चोरीला; पुरावा मिळू नये म्हणून CCTV चा डीव्हीआरही पळवला...

Jamgaon News: रविवारी सुट्टी असतानाही सीईओंची जामगावला भेट; अपघातात मृत सेविकेच्या कुटुंबीयांचे सांत्वन

IND W VS ZIM W 2ND ODI NEWS: हरमनप्रीत दीप्तीची शतके, वैष्णवीची गोलंदाजीत कमाल! झिम्बाब्वेला लोळवत भारताने मालिका खिशात घातली

Dutch Farmers: डच ट्रॅक्टर रस्त्यावर, मागणी संसदेच्या टेबलावर; नायट्रोजन संघर्षाची सात वर्षे; २०३५चे लक्ष्य ठरले, पण डच शेतकऱ्यांना हवी आहे स्पष्टता

SCROLL FOR NEXT