हिर्डोशी, ता. २३ : भोर तालुक्यातील वाढती लोकसंख्या आणि रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयाची क्षमता ५०वरून १०० खाटांपर्यंत वाढवावी, अशी मागणी पंचायत समितीच्या सभापती मनीषा कंक व रुग्ण कल्याण समितीने आमदार शंकर मांडेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
भोर हा दुर्गम आणि डोंगराळ तालुका असल्याने येथील गरीब रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांना उपचारासाठी या रुग्णालयावर अवलंबून राहावे लागते. तसेच, पुणे- बंगलोर आणि महाड- पंढरपूर मार्गावरील अपघातातील रुग्णांनाही येथेच आणले जाते. मात्र, खाटांच्या कमतरतेमुळे अनेकदा रुग्णांना जिल्हा रुग्णालयात हलवावे लागते.
रुग्णालयाची क्षमता १०० खाटांची झाल्यास अतिरिक्त तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका आणि आधुनिक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध होतील. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेत मोफत उपचार मिळणे शक्य होईल, असे पत्रात नमूद केले आहे. यावेळी माजी उपसभापती सुनील भेलके, संतोष कंक, सुरेश कडू, नितीन सोनावले उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.