पुणे

पशुधन वाचविण्यासाठी भोरमध्ये उपाययोजना

CD

भोर, ता. २४ : दुष्काळजन्य परिस्थितीत भोर तालुक्यातील पशुधन वाचविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धता तपासून पाहिली जात आहे. आगामी रब्बी हंगामात चाऱ्यावरील उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना चारा व्यवस्थापनाबाबत व हिरवा चारा निर्मितीबाबत प्रशिक्षण दिले जात आहे.
आतापर्यंत भोर-वेनवडी, भोंगवली व केंजळ येथील शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच चाऱ्यासाठी मका व बियाण्यांचा पुरवठा सुरू आहे, अशी माहिती तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. किशोरकुमार मुळे यांनी दिली. रब्बी हंगामात हिरव्या चाऱ्याची टंचाई भासू नये म्हणून तालुक्यात मका आणि (नेपियर/सुगरग्रॅस) अतिरिक्त बियाण्यांची मागणी नोंदवण्यात आली आहे. आतापर्यंत तालुक्यातील शेतकऱ्यांना ४०० किलो ऊस आणि ३ हजार ७०८ किलो मका असे एकूण चार हजार १०८ किलो बियाणांचे वाटप केले आहे. यामुळे रब्बी हंगामात आणखी १०२ टन चारा उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
तालुक्यात एकूण पशुधन संख्या ५१ हजार ३६७ असून त्यामध्ये गायींची संख्या सर्वाधिक २२ हजार ३२९ आहे. याशिवाय १६ हजार ६७ म्हैस, ८ हजार ७८८ शेळ्या, २ हजार ३८१ मेंढ्या आणि १ हजार ८०२ वासरांची संख्या आहे. सद्यस्थितीत तालुक्यात हिरवा चारा ५५ हजार ८६० टन हिरवा आणि २२ हजार ३४४ टन वाळलेला चारा उपलब्ध आहे. डिसेंबर महिन्याअखेर २२ हजार ३४४ टन हिरवा चारा आणि ७ हजार ८२० टन वाळलेला चारा राहणार आहे. यामुळे तालुक्यात पुढील ७० दिवस पुरेल इतका वैरण साठा आहे.
दुष्काळामुळे आगामी काळात भूजल पातळी खालावल्यास पिण्याच्या पाण्याचा व शेतीसाठी पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.

‘मुरघास’ बनवण्याचे विशेष प्रशिक्षण
उन्हाळ्याच्या उत्तरार्धात हिरव्या चाऱ्याची टंचाई जाणविण्याची शक्यता आहे. यावर उपाययोजना म्हणून सायलेज (मुरघास) निर्मितीसाठी शेतकऱ्यांना वाळलेला व हिरवा चारा साठवून ठेवण्यासाठी ‘मुरघास’ बनवण्याचे विशेष प्रशिक्षण व प्लॅस्टिक बॅग्स (पिट) अनुदानावर उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुहेरी हत्याकांडानं यवतमाळ हादरलं! जगत मंदिर परिसरात रक्तरंजित थरार नेमका कसा घडला?

Murlidhar Mohol : राज्यातील सहकार चळवळ देशाला मार्गदर्शक; केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Prithviraj Chavan : मनोज जरांगे-पाटलांचे नेतृत्व संपवायचे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव

Pakistan Crisis: बापरे! पाकिस्तानात एका गॅस सिलिंडरची किंमत पोहचली ७ हजारांवर; कारण काय?

Sukanya Samruddhi Yojna : घरात तीन मुली आहेत? मग टेन्शन सोडा; जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांतर्गत कशी उभी राहील कोटींची संपत्ती!

SCROLL FOR NEXT