हिर्डोशी, ता. ६ : भोर तालुक्यातील महावितरणच्या १३ विकासकामांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून एक कोटी ४० लाख ६० हजार रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती आमदार शंकर मांडेकर यांनी दिली.
भोरमधील रामबाग चौक येथे अतिरिक्त २२/२०० केव्हीए, २२ केव्ही उच्चदाब वहिनी पाच खांब व लघुदाब वाहिनी पाच खांब बसविण्यासाठी १५ लक्ष ६४ हजार, उत्रौली येथे एरियल बंच केबल व १० जुने खांब बदलण्यासाठी १० लाख २९ हजार, सारोळे येथील महांगरे वस्ती येथे १०० केव्हीए विद्युत रोहित्र बसविण्यासाठी १७ लाख १२ हजार, न्हावी ३२२ येथील जिल्हा परिषद शाळा व मंदिर परिसरातील एलटी ओव्हर हेड विद्युत वाहिनीचे एरियल बंच केबलमध्ये रूपांतरणासाठी ८ लक्ष १ हजार, कांजळे मेन रोड ते काळूबाई मंदिरापर्यंत विजेचे १० खांब टाकण्यासाठी २ लाख ६३ हजार, कांबरे खे.बा. येथील गिरेवाडी येथे नवीन १२ खांब वाहिनीसह १०० केव्हीए विद्युत रोहित्र बसविण्यासाठी १५ लाख ६६ हजार, भोलावडे येथील जुने खांब व एरियल केबल बदलण्यासाठी १३ लाख ८९ हजार, पिसावरे व महुडे पाणी पुरवठा नवीन १०० केव्हीए विद्युत रोहित्र बसविणे ११ लाख ९६, बारे खुर्द येथे १०० केव्हीए विद्युत रोहित्र बसविण्यासाठी १२ लाख ९४ हजार, आंबवडे घोरपडेवाडी स्मशानभूमीजवळील विद्युत रोहित्र स्थलांतरित करण्यासाठी २ लाख ३४ हजार, टापरेवाडी येथे १०० केव्हीए विद्युत रोहित्र बसविण्यासाठी ८ लाख १६ हजार, हर्णस येथे १०० केव्हीए विद्युत रोहित्र बसविण्यासाठी ११ लाख ६६ हजार तर म्हाळवडी येथे १०० केव्हीए विद्युत रोहित्र बसविण्यासाठी १० लाख २४ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.