पुणे

भोर पंचायत समितीत कलगीतुरा

CD

भोर, ता. २९ : पंचायत समितीच्या सभापती मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप करीत भाजपच्या सदस्यांनी त्यांचा निषेध करून मासिक सभेतून सभात्याग केला. तर, प्रसिद्धीसाठी माझ्यावर चुकीचे आरोप करीत आहेत, असा दावा सभापतींनी केला.
भोर पंचायत समितीच्या गुरुवारी (ता. २९) झालेल्या मासिक सभेच्या सुरुवातीस राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सभापती मनीषा कंक यांच्या मनमानी कारभाराचा निषेध करून भाजपचे पंचायत समिती सदस्य रोहन बाठे, सुषमा चव्हाण आणि गिता आंबवले यांनी सभात्याग केला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.
विरोधी पक्षाच्या म्हणजे भाजपच्या सदस्यांना कामकाजात सहभागी करून न घेणे, सभेचा अजेंडा व इतिवृत्त वेळेत न देणे, निधीवाटपात पक्षपातीपणा करून भाजपच्या सदस्यांनी सुचविलेल्या विकासकामांना निधी न देणे, सभागृहात सुचवलेल्या कामांमध्ये बदल करून जिल्हा परिषदेकडे आराखडा मंजुरीसाठी पाठविणे, सभागृहात दिलेली आश्वासने न पाळणे, दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी व जनावरांसाठी निधीची तरतूद न करणे आणि सभेच्या कामकाजाचे चित्रीकरण न करणे (इन कॅमेरा सभा न घेणे), आदी आरोप भाजपच्या सदस्यांनी केले. याशिवाय या सभात्यागाच्या घटनेची नोंद सभेच्या इतिवृत्तात घेण्याची विनंतीही भाजपच्या सदस्यांनी गटविकास अधिका-यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

मी मनमानी कारभार करून नसून, बहुमतावर निर्णय घेत आहे. दुष्काळाच्या परिस्थितीसाठी तालुक्यात गट व गणनिहाय मिटींग घेऊन दुष्काळासह पाणीटंचाईचा आराखडा तयार करून जिल्हा परिषदेकडे पाठविला आहे. मात्र, भाजपचे सदस्य एकाही मिटींगला उपस्थित नव्हते आणि आता प्रसिद्धीसाठी माझ्यावर चुकीचे आरोप करीत आहेत.
- मनीषा कंक, पंचायत समिती, भोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme court on firecracker ban : "विराट कोहलीची मदत घ्या!"; फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, पण सरकारला झापलं!

Raj Thackeray: ''2029 पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं..'' राज ठाकरेंचा चिमटा; दोन्ही ठाकरेंसह मुख्यमंत्री एकाच मंचावर

Pune Theft : मार्केटयार्डात डोळ्यात स्प्रे मारून ३० लाखांची रोकड लुटली

Mulshi News : मुळशी तालुक्यात पिक नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश

Pachod News : कत्तलीसाठी नेण्यात येणारे २३ बैल पाचोड पोलिसांकडून जप्त; आयशर वाहनासह २४ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

SCROLL FOR NEXT