पुणे

भोरमध्ये भात कापणीची लगबग

CD

हिर्डोशी, ता. १४ : भोर तालुक्यातील हिरडस मावळातील वाठार हिमा परिसरात भात कापणीची लगबग दिसून येत आहे. मात्र, यंदा भात पोसणीच्या काळात पावसाने दडी मारल्याने भात पीक वाया गेले. त्यामुळे यावर्षी भाताच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

तालुक्यात साधारण ७५०० हेक्टर क्षेत्रावर भात पेरणी करण्यात येते. यावर्षी पिके चांगली तरारली होती. मात्र, ऐन पोसणीच्या काळात पावसाने दडी मारली. त्यामुळे पिके वाया गेली. तसेच यातूनही उरलेल्या पिकांना पावसाने झोडपले. त्यामुळे यंदा भात शेतीत शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. भात पीक करपून गेल्यामुळे जनावरांच्या चाऱ्यासाठी उपलब्ध असणारा पेंडाही खराब झाला आहे. त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

भोर तालुक्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाची परिस्थिती आहे. पाण्याअभावी भात पिके करपली आहेत. तर काही पिके पोसलीच नाहीत. काही शेतकऱ्यांनी पाणी साठ्याच्या उपलब्धतेनुसार भाताला पाणी दिले होते. तसेच जी पाण्याची खाचरे होती त्या ठिकाणी थोडे का होईना पण पीक पदरात पडेल या आशेवर कापणीला सुरुवात केली आहे. तर काही ठिकाणी जनावरांना चारा तरी मिळेल या अपेक्षेने कापणी सुरु केली आहे. आधीच पिके वाया गेल्याने नुकसान होणार असल्याने शेतकरी आपल्या कुटुंबातील सदस्यांसह भात कापणी करत आहेत. पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असल्याने यंदा भात उत्पादनात मोठी घट होणार असल्याचे शेतकरी वर्गाकडून सांगण्यात येत आहे.

दरवर्षी ३०-३५ पोती भात निघते. परंतु, यंदा पिके करपली आहेत. ओलावा असलेल्या ठिकाणी भात पोसले आहे. दहा-बारा पोती निघण्याची अपेक्षा आहे. त्यातूनही मळणी केल्यावरच उत्पादन समजेल. मात्र, यंदा उत्पादनात मोठी घट होणार आहे.
- शंकर खाटपे, वाठार हिमा (ता.भोर)

04196भोर

IND vs PAK Final, Video: मोहित उल्वाचा विजयी चौकार अन् भारताचा पाकिस्तानी खेळाडूंसमोर जल्लोष; आर्यवीर सेहवाग ठरला मालिकावीर

Manoj Jarange: 'पुढची क्लिप डेंजर!' जरांगेंचा नवा ऑडिओ बॉम्ब येणार? फडणवीस-शिंदेंना काय दिला इशारा?

'सहा महिने कोणी विचारलं नाही, की यूपी-बिहारच्या लोकांना बोलतात'; 'त्या' पोस्टवरून प्रशांत किशोरांची राज ठाकरेंवर टीका, काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update: वसई-विरारमध्ये २४ तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

IND vs PAK Asia Cup Final: कोण आहे मोहित उल्वा, ज्याने शेवटच्या चेंडूवर फोर मारत भारताला पाकिस्तानविरुद्ध जिंकवलं?

SCROLL FOR NEXT