पुणे

भोसरीत आपटी बॉम्बचा स्फोट; 5 वर्षांच्या चिमुकलीनं गमावला जीव

सकाळ वृत्तसेवा

भोसरी : वडमुखवाडीतील अलंकापुरम रस्त्यावरील नानांश्री हॉटेलच्या पाठीमगील मोकळ्या जागेत असलेल्या गोठ्याजवळ डुकरांना मारण्यासाठी असलेल्या कचऱ्यात सापडलेले आपटी बॅाम्ब फोडताना झालेल्या स्फोटात पाच वर्षाच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. तर दोन लहान मुले जखमी झाली आहेत. ही घटना शनिवारी (ता. ५) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

दिघी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडमुखवाडीतील कचऱ्यात सापडलेले डुकरांना मारण्यासाठीचे आपटी बॅाम्ब लहान मुलांनी घेऊन ते फोडण्याचा प्रय्तन केला. यामध्ये आपटी बॅाम्बचा स्फोट होऊन राधा गोकुळ गवळी (वय ५) या मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर आरती गोकुळ गवळी (वय ४) आणि राजू महेश गवळी (वय ४) हे दोघे जखमी झाले आहेत.

गवळी कुटुंबिय हे मुळचे गुजरातचे आहेत. चरितार्थासाठी हे कुटुंबिय वडमुखवाडी येथे राहण्यास आले आहे. राधा हिचे वडील गोकुळ गवळी हे सकाळी दूध टाकण्यासाठी घराबाहेर पडले होते. तर महिला घरामध्ये काम करत होत्या. लहान मुले-मुली घराबाहेर खेळत असताना त्यांना कचऱ्यामध्ये आपटी बॅाम्ब सापडले. हे बॅाम्ब दगडाने राधा फोडत असताना त्याचा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की स्फोट झाल्यावर राधा या चिमुकलीचा पाय निखळून पडला. पुढील तपास दिघी पोलिस ठाणे करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

First Solo Trip Tips: पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जाताय? मग हे ‘गोल्डन रूल्स’ नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : पुण्यात उद्या MPSC विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चा

SCROLL FOR NEXT