crime_logo
crime_logo 
पुणे

भोसरी : त्याने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव

संदीप घिसे

पिंपरी (पुणे) - कर्ज फेडण्यासाठी आणि मेहुण्याकडून पैसे उकळण्यासाठी त्याने स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचला. स्वतःच्या पत्नीकडेच त्याने मित्राच्या मोबाइलवरून फोन करून पाच लाख रुपयांची खंडणीही मागितली. अपहरण झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित कारवाई करत या घटनेचा भांडाफोड केला. ही घटना मंगळवारी सकाळी भोसरी येथे घडली.

विठ्ठल वाबळे असे अपहरणाचा बनाव रचलेल्याचे नाव आहे. याबाबत त्यांची पत्नी सीमा वाबळे यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंगळवारी सकाळी विठ्ठल वाबळे हे आपल्या गवळीनगर, भोसरी येथील प्लेसमेंटच्या टाटा ऑटो कन्सटंन्सी या कार्यालयामध्ये गेले होते. त्यावेळी आपल्या पतीचे अपहरण झाल्याची फिर्याद सीमा यांनी दिली. तसेच खंडणीखोरांनी पाच लाख रुपयांची खंडणीची मागणी केली. अपहरण झाल्याची माहिती मिळताच भोसरी पोलिस, गुन्हे शाखा, खंडणी विरोधी पथक यांनी समांतर तपासला सुरूवात केली. अपहरण झालेली व्यक्ती स्वारगेट परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार मध्यरात्री उशिरा कारवाई करत विठ्ठल वाबळे यांची सुटका केली. त्यानंतर केलेल्या चौकशीमध्ये वाबळे यांनी आपल्या मित्राच्या मदतीने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचल्याचे पोलिसांना सांगितले. कर्जबाजारीपणा तसेच मेहुण्याकडून पैसे उकळण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांना सांगितले. भोसरी पोलीस आता वाबळे यांच्या मित्राचा शोध घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT