भोसरी, ता. १५ ः भोसरीतील मुख्य चौक आणि रस्त्यांवरील अनधिकृतपणे फ्लेक्समुळे परिसराचे विद्रुपीकरण होत आहे. याखेरीज पिंपरी चिंचवड महापालिकेचे उत्पन्नही बुडत आहे. या फ्लेक्सच्या लोखंडी चौकटी वाऱ्याने रस्त्यावर पडण्याची शक्यता असल्याने पादचारी, वाहन चालकांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे.
भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखालील आकर्षक नक्षीकाम केलेले स्तंभ आहे. या स्तंभांवरही जाहिराती चिटकविण्यात येत आहेत. काही दिशादर्शक फलक आणि भोसरी-आळंदी रस्ता चौक, संविधान चौक, चांदणी चौक आदी भागांतील वाहतूक नियंत्रक दिव्यांच्या खांबांनाही फ्लेक्स लावण्यात येत आहेत. विविध सण, नेत्यांचे वाढदिवस, महापुरुषांची जयंती आदीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी, पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहण्यासाठी त्याचप्रमाणे काही व्यावसायिक विक्रीच्या वस्तूंची जाहिरात करण्यासाठी फ्लेक्स लावण्यात आले आहेत.
अनधिकृत फ्लेक्स कुठे ?
भोसरीतील पीएमटी चौक, राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली, आळंदी रस्ता, दिघी रस्ता, पीसीएमसी चौक, भोसरी गावठाणातील बापूजीबुवा चौक, लांडेवाडी चौक, पुणे-नाशिक महामार्गाचा दोन्ही बाजूंकडील सेवा रस्ता आदी.
अपघाताचा धोका
भोसरीतील बीआरटीएस टर्मिनल चौक, पीएमटी चौक, संविधान चौक, आळंदी रस्त्यावरील मंगलमूर्ती चौक, पीसीएमसी चौक, बापूजी बुवा चौक आदी भागांत प्रमाणापेक्षा अधिक लांबी रुंदीचे अनधिकृत फ्लेक्सला लोखंडी सांगाडाही असतो. जोराच्या वाऱ्यामुळे हे फ्लेक्स पडून अपघातही होऊशकतो.
भोसरीतील मुख्य चौकात अनधिकृत फ्लेक्सचे सांगाडे उभे आहेत. पदपथापर्यंत ते येत असल्याने चालताना कसरत करावी लागत आहे. कमी उंचीवरील फ्लेक्स डोक्याला लागून पादचाऱ्यांना दुखापतही होण्याची शक्यता आहे.
- सीताराम यादव, पादचारी, भोसरी
अनधिकृत फ्लेक्सविरोधात आठवड्यातून दोन दिवस कारवाई करण्यात येते. या कारवाईत फ्लेक्सच्या लोखंडी चौकटी जप्त केल्या जातात. दंड भरल्याशिवाय त्या चौकटी परत केल्या जात नाहीत. अनधिकृत फ्लेक्स लावले जाऊ नयेत यासाठी ठोस उपाय योजना करण्यात येईल.
- तानाजी नरळे, इ क्षेत्रीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.