भोसरी, ता. १६ ः भोसरी, दिघी, इंद्रायणीनगरसह आदीं भागांत स्वातंत्र्यदिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजवंदन, वंदे मातरम, राष्ट्रगीत, राज्य गीतांचे सामूहिक गायन, आकर्षक तिरंगी रंगांची विद्युत रोषणाई, संचलन आदी कार्यक्रमांचा समावेश होता.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयात प्रभागाध्यक्षा अर्चना सस्ते यांनी ध्वजवंदन केले. यावेळी वंदे मातरम, राष्ट्रगीत, राज्य गीत सामुहिक घेण्यात आले. यावेळी ‘इ’ क्षेत्रीय अधिकारी परशुराम वाघमोडे, कार्यकारी अभियंता शिवराज वाडकर, सहाय्यक आरोग्याधिकारी राजेश भाट, प्रशासन अधिकारी संजय घुले आदी उपस्थित होते.
‘ल’ कार्यालयात अभिवादन
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (लोहगड) ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयात प्रभागाध्यक्षा रेखा देवकर यांनी ध्वजवंदन केले. यावेळी कार्यकारी अभियंता सुनीलदत्त नरोटे, नगरसेवक जितेंद्र ननावरे, वर्षा जगताप आदींसह पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
आकर्षक तिरंगी रोषणाई
भोसरीतील पीएमटी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ आकर्षक रोषणाईसह तिरंगी फुग्यांची सजावट करण्यात आली. त्याचप्रमाणे लांडेवाडीतील ऐतिहासिक प्रवेशद्वारावर आकर्षक तिरंगी रंगांची विद्युत रोषणाई करण्यात आली.
दिघीत ध्वजवंदन
दिघीतील विक्रमशिला प्रबोधिनी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे समाधान मोरे, दादाराव वानखेडे, श्रीकृष्ण मोरे हस्ते पूजनाने करण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्या गौकर्णा मोरे, भूमिका पुणेकर यांनी ध्वजवंदन केले. व्याख्याते सी. डी. खरात यांचे व्याख्यान झाले. प्रशांत सावंत यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाचे वाचन केले. प्रवीण पुणेकर यांनी सूत्रसंचालन केले.
आरोग्य तपासणी
आदिनाथ क्रिकेट क्लबच्या सहकार्याने आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात ४३ खेळाडू आणि नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. विवेक दरेकर, श्रेयस जगदाळे, विजय जगदाळे आदींनी संयोजन केले.
संचलन, ध्वजवंदन
शाहूनगरात नालंदा फाउंडेशन संचलित धम्मचक्र बुद्ध विहारात व्याख्याते एस. एल. वानखेडे यांनी ध्वजवंदन केले. अशोक इंगवले यांनी संचलन केले. यावेळी डॉ. रवींद्र होवाळ, साहेबराव सोनवणे, आशा अहिवळे यांचे व्याख्यान झाले. यावेळी मंगेश सोनकांबळे, राहुल गोरे, अशोक इंगवले आदी उपस्थित होते. सखाराम इंगवले यांनी प्रास्ताविक केले. विश्वास लव्हे यांनी सूत्रसंचालन केले.
व्याख्यान
मोशीतील आदर्शनगरातील स्वाभिमानी प्रतिष्ठानद्वारे आयोजित कार्यक्रमात व्याख्याते दत्तात्रय शिंदे यांचे स्वातंत्र्यदिनावर व्याख्यान झाले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेंद्र प्रगणे, राजू कांबळे, रवींद्र शिंदे, अर्चना कांबळे, माया प्रगणे, सुभाष वाकळे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.