Swimming-Tank 
पुणे

भोसरी दुर्घटनेच्या चौकशीसाठी समिती

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - महापालिकेच्या भोसरी सहल केंद्रातील जलतरण तलावात पोहताना तरुणाचा बुडून मृत्यू झाल्या प्रकरणाची महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गंभीर दखल घेतली आहे. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. येत्या आठवड्यात अहवाल देण्याचे आदेश त्यांनी समितीला दिले आहेत. 

या केंद्रातील जलतरण तलावात पोहताना गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सनी बाळासाहेब ढगे याचा बुडून मृत्यू झाला. जीवरक्षकांचा निष्काळजीपणा त्यास जबाबदार असल्याचा आरोप कार्यकर्ते सम्राट फुगे यांनी केला आहे. तसेच या प्रकाराची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. 

सम्राट फुगे म्हणाले, ‘‘दुर्घटना घडली तेव्हा तलावात जवळपास ८० जण पोहत होते. सनीला फिट येण्याचा त्रास आहे किंवा नाही याची माहिती मला नाही. त्याचे कुटुंबीय सांगू शकतील. परंतु, फिट येऊन पाण्यात पडल्याचे त्याला कोणी पाहिले नाही. तो तलावाच्या तळालाच पडलेला दिसला. मग, त्याला फिट आली, असे कसे म्हणता येईल ?’’ 

पालिकेचे सहाय्यक आयुक्त (क्रीडा) नितीन कापडणीस म्हणाले, ‘‘कर्तव्यात कसूर केल्याबद्दल निलंबित का करू नये? अशा आशयाची कारणे दाखवा नोटीस तलावाचे लिपिक, २ जीवरक्षक आणि २ मदतनीस यांना यापूर्वीच बजाविण्यात आली आहे. याखेरीज, आयुक्तांनी त्रिसदस्यीय समिती नेमण्याचे निर्देश दिले आहेत. या समितीत अग्निशामक दलाचे अधिकारी किरण गावडे आणि आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांचा समावेश करण्यात आला आहे. मृत व्यक्तीला कोणता त्रास होता किंवा नाही हे शवविच्छेदन अहवाल आल्यावरच स्पष्ट होऊ शकेल.’’

भोसरीतील दुसरी दुर्घटना 
या तलावात याच महिन्यात बांधकाम व्यावसायिक किरण लांडगे हे पोहताना क्‍लोरिनचा त्रास होऊन बेशुद्ध पडले होते. त्यानंतर, ही दुसरी दुर्घटना घडली आहे. 

सनीला फिटचा त्रास?
सनी ढगे याला फिटचा त्रास होता, तसेच त्याने तलावात उतरण्यापूर्वी नशा केल्याचा दावाही क्रीडा विभागाने केला आहे. त्याच्या पोटावर शस्त्रक्रियाही झाल्याचे या विभागाचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adani Airlines: एअर इंडिया-इंडिगोनंतर विमान क्षेत्रात नवा खेळाडू! अदाणी समूहाची लवकरच नव्या क्षेत्रात एन्ट्री?

भाजपला ८५० जागाच का हव्यात? राहुल गांधींनी सांगितलं नेमकं कारण; डिलिमिटेशनवरून मोदी सरकारला घेरलं

Who Is Ankon Aich: एका षटकात ६ षटकार, १३२ चेंडूंत २३६ धावा; चर्चेत आलेला अंकन आईच नेमका कोण आहे?

Delimitation Bill 2026 : राज्यांच्या विधानसभा जागा ६५० पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव; १३२व्या घटनादुरुस्ती विधेयकावर अमित शहांचे मोठे विधान

Marathi News Live Updates: व्यंगचित्रकारांची मुस्कटदाबी सहन करणार नाही- गौरव सर्जेराव

SCROLL FOR NEXT