माेफत आरोग्य शिबिरास
भुईंजला उत्स्फूर्त प्रतिसाद
ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन उत्साहात
भुईंज, ता. ५ : येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात झाले. आचार्य भृगुऋषी मठ येथे झालेल्या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक, मान्यवर व ग्रामस्थांची उपस्थिती होती.
तणावमुक्ती या विषयावर अशोक देशमुख यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सकारात्मक विचार, निरोगी जीवनशैली आणि आनंदी वृत्ती यांचे महत्त्व अधोरेखित केले.
उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा अनुराधा कोल्हापुरे अध्यक्षस्थानी होत्या. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवसंपन्न मार्गदर्शनामुळे समाजाला दिशा मिळते, असे सांगत संघाच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी पंचायत समिती सदस्य डॉ. सुरभी भोसले यांचा विशेष सन्मान करण्यात आला. विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या युवक-युवती व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमानिमित्त येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने आयोजित मोफत आरोग्य शिबिरालाही नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमास संघाचे अध्यक्ष रामदास जाधव, उपाध्यक्ष जगनाथ दगडे, सचिव अशोक चव्हाण, पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.
-----------------------------------
1457
भुईंज ः ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमास उपस्थित डॉ. सुरभी भोसले- चव्हाण, अनुराधा कोल्हापुरे, रामदास जाधव, जगन्नाथ दगडे आदी.
------------------------------------