Sarathi Institute 
पुणे

धार्मिक कर्मकांडावर आक्षेप; 'सारथी'चा भूमिपूजन कार्यक्रम उधळला

मराठा क्रांती मोर्चाकडून हा कार्यक्रम उधळून लावण्यात आला.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : सारथी संस्थेच्या प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन कार्यक्रम मराठा क्रांती मोर्चानं बुधवारी उधळून लावला. या ठिकाणी होत असलेल्या धार्मिक कर्मकांडावर आक्षेप घेत या कार्यक्रमाला विरोध दर्शवण्यात आला. या विधीला संस्थेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. (Bhumi Pujan program of Sarathi building was stopped by Maratha kranti morcha)

मराठा समाजाच्या उत्कर्षासाठी राजर्षी शाहू महाराज यांच्या नावानं पुण्यात सारथी संस्थेची स्थापना करण्यात आली. या इमारतीचा भूमिपूजन सोहळा आज पुण्यात सुरु होता. यासाठी सारशीचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष देखील उपस्थित होते. यावेळी धार्मिक विधी सुरु असतानाच मराठा क्रांती मोर्चाचे काही पदाधिकारी तिथं पोहोचले आणि त्यांनी या पूजाविधीवर आक्षेप घेतला. शाहू महाराजांच्या विचाराच्या विरोधात हा प्रकार सुरु असल्याचं सांगत कर्मकांड आणि अंधश्रद्धांना शाहू महाराजांनी नेहमीच विरोध केला होता. त्यामुळं भूमिपूजनात होत असलेला पूजाविधी उधळून लावत असल्याचं मराठा क्रांती मोर्चानं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC MP Resignation : तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी घडामोड, ममता बॅनर्जींना मोठा धक्का, राज्यसभा खासदार प्रकाश चिक बडाईक यांचा तडकाफडकी राजीनामा

Latest Marathi News Live Update : शिर्डीच्या साई संस्थानचा कारभार सात वर्षांपासून विश्वस्त मंडळाविना

Gold Rate Today: युद्धाच्या तणावात सोन्याचे भाव कोसळले! उच्चांकापासून 35,000 तर दोन दिवसांत 8 हजारांनी स्वस्त; आजचे ताजे दर पाहा

Ozar Shirdi Road: ओझर-शिर्डी मार्ग रुंदीकरणाला २१३ कोटींची मंजुरी, कुंभमेळा निधीतून होणार काम; वाहतूक, पर्यटन आणि कृषी अर्थव्यवस्थेला मिळणार नवे बळ

Kolhapur Engineer End Life : वडिलांचा कारखाना, भाऊ परदेशात नोकरीला; एम.टेक विशालचा टोकाचा निर्णय, MIDC रोडवर धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT