भुतकरवाडी येथे बंद घर फोडून चोरी
अहिल्यानगर, ता. १३ ः शहरातील भुतकरवाडी परिसरात पंपिंग स्टेशन रोडवर एका बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अजित प्रेमराज शेकडे (वय ५३, रा. भुतकरवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे एमआयडीसीमधील पुण्यात एका खासगी कंपनीत कामाला आहेत. ते आपल्या कुटुंबासह एका लग्नासाठी गेले होते. ८ मे रोजी सकाळी त्यांनी आपले घर कुलूप लावून बंद केले होते. दरम्यान, चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाटातील सामानाची उचकापाचक करून सोन्याच्या दोन अंगठ्या, रोख रक्कम आणि लॅपटॉप असा एकूण एक लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ११ मे रोजी पहाटे शेकडे कुटुंब घरी परतले असता, त्यांना घराच्या दरवाजाचा कोयंडा तुटलेला दिसला. घरात सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते. त्यांनी तातडीने तोफखाना पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.