Pune Municipal Corporation sakal
पुणे

Pune News: पुणे महानगरपालिकेची तीन बड्या अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई; नेमकं प्रकरण काय?

पुणे महानगरपालिकेने आपल्या तीन अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई

अंकिता खाणे (Ankita Khane)

पुणे महानगरपालिकेतील तीन अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. महानगरपालिकेची फसवणूक केल्याचा आरोप या तीन अधिकाऱ्यांवर आहे. तर कारवाई झालेले हे अधिकारी कनिष्ठ अभियंता आहे. या तीन अधिकाऱ्यांवर कारवाई करत त्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. यामुळे पुणे महानगरपालिकेतील कर्मचारी अन् अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी या तिन्ही अधिकाऱ्यांवर बडतर्फची कारवाई केली आहे. (Latest Marathi News)

राज्यातील महापालिकांमध्ये कर्मचारी भरतीवर बंदी होती. राज्य सरकारने बंदी उठवल्यानंतर पहिल्यांदा पुणे महापालिकेत भरती सुरू झाली. महानगरापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून भरती सुरु करण्यात आली. यामध्ये निवडलेल्या काही कर्मचाऱ्यांची प्रमाणपत्रे ही बोगस असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या.(Latest Marathi News)

यासंदर्भात तीन अधिकार्‍यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीकडून कनिष्ठ अभियंता म्हणून भरती झालेल्या 50 जणांची कागदपत्रे तपासण्यात आली. त्याचा अहवाल आयुक्तांना देण्यात आला होता.

चौकशी समितीच्या अहवालानुसार, तीन कनिष्ठ अभियंत्यांनी अनुभवाचे बनावट दाखले जोडल्याचे स्पष्ट झाल्यामुळे या तीन कनिष्ठ अभियंत्यांना महानगरपालिकेच्या सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिले आहेत. या तिघांवर अनुभवाचे खोटे पुरावे सादर करून नोकरी मिळविल्याचा आरोप आहे.(Latest Marathi News)

पुणे महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता पदाच्या १५० जागा रिक्त आहे. यासाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती आयुक्त विक्रमकुमार यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT