Pune Crime esakal
पुणे

पुणे पोलिसांची मोठी कारवाई! उत्तर प्रदेशच्या तोतया आमदार, मंत्र्यासह बनावट नोटा देणारी टोळी गजाआड

रुपेश नामदास

Pune Crime: उत्तर प्रदेश विधानसभेत आमदार, मंत्री असल्याचा बनाव रचून लुबाडणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. या टोळीने एका मार्बल व्यावसायिकाला ३० लाखांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवून ५ लाख ३४ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना गुरुवारी रात्री उशिरा अटक केली.

या संदर्भात खराडी येथील ५४ वर्षीय व्यावसायिकाने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रूपाली राऊत, संजयकुमार पांडे, विकासकुमार रावत, समीर ऊर्फ विशाल घोगरे (चौघे रा. निलंगा, जि. लातूर) आणि अशोक पाटील (रा. कोल्हापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रूपाली राऊत, संजयकुमार पांडे आणि विकासकुमार रावत अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची खराडी बायपास येथे २६ मार्चला रूपाली नावाच्या महिलेसोबत ओळख झाली. त्या वेळी या महिलेने आपण मंत्री आहोत, असे सांगून तिप्पट पैसे मिळवून देण्याची योजना सांगितली. तिने आरोपी पांडे हा उत्तर प्रदेश विधानसभेत आमदार असल्याचे सांगून फिर्यादीचे बोलणे करून दिले. त्यांना पाच लाख रुपये दिल्यास त्याच्या मोबदल्यात ३० लाख रुपये परत मिळतील, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Home Loan EMI: महिन्याला ३.५ लाख पगार, तरीही १.७ कोटींचं घर घेतलं नाही! EMI पाहून कपलने का घेतला मोठा निर्णय?

Prithviraj Chavan on PM Modi : देशात सत्ताबदल नक्की होईल, पण तो काँग्रेस पक्षामुळे नव्हे तर... पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?

जमलं तर थोडीशी जमीन घ्या... स्वतःच्या जमिनीवर डाळ तांदूळ पिकवून खातेय लोकप्रिय अभिनेत्री; म्हणते- इतका फरक...

Marathi News Live Updates : राहुल गांधींचा पोलीस ठाण्यात ठिय्या; जंतर-मंतर आंदोलनातील जखमी विद्यार्थ्याच्या तक्रारीवर एफआयआरची मागणी

Shahada Bribery Case: वनपाल संजय पवार यांना न्यायालयीन कोठडी; सव्वादोन महिन्यांनंतर ‘एसीबी’ची दुसरी कारवाई

SCROLL FOR NEXT