पुणे

यंदाची दिवाळी पवार कुटुंबियांसाठी वेगळी; घेतला मोठा निर्णय

मिलिंद संगई

बारामती : बारामतीत दरवर्षी साजरा होणारा दिवाळी पाडव्याचा पवार कुटुंबियांचा भेटीगाठींचा कार्यक्रम यंदा होणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबियांनी हा निर्णय घेतला असून, राज्यातील जनतेने पाडव्याच्या दिवशी भेटीसाठी बारामतीत येऊ नये असे आवाहन एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे करण्यात आले आहे. यंदा कोरोनामुळे संसर्ग होऊ नये या उद्देशाने हा कार्यक्रम टाळण्याचा निर्णय झाला आहे. स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे ही माहिती दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरवर्षी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी राज्यातून लोक पवार कुटुंबियांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी करतात. यंदा कोरोनामुळे हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या सहकाऱ्यांनी, हितचिंतक बंधू-भगिनींनी यंदा बारामतीला न येता आपापल्या घरुनच शुभेच्छा द्याव्यात. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करीत आपापल्या घरीच सुरक्षित दिवाळी साजरी करावी. कोरोनाला हरवल्यानंतर पुढची दिवाळी मात्र, पारंपरिक उत्साहात, जल्लोषात बारामतीला एकत्रित येऊन साजरी करुया, असे आवाहन पवार कुटुंबियाने केले आहे.

तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार  सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि पवार कुटुंबियांच्या वतीने संयुक्त निवेदन प्रसिद्धीस देण्यात आले असून, बारामती येथे परंपरेनुसार दरवर्षी होणारा सामुहिक दिवाळी उत्सव तसेच पाडव्याचा स्नेहभेटीचा पारंपारिक कार्यक्रम कोरोनामुळे यावर्षी रद्द करावा लागत असल्याबद्दल कुटुंबियाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

दरवर्षी दिवाळीला पवार कुटुंबिय बारामतीत येऊन बारामतीकरांसह एकत्रितपणे दिवाळी साजरा करतात. पाडव्याला राज्यभरातून लाखो सहकारी, हितचिंतक बंधू-भगिनी बारामतीत येऊन पवार कुटुंबियांना भेटतात. दिवाळीच्या शुभेच्छा देतात. हा कार्यक्रम सर्वांचा आनंद, उत्साह वाढवणारा असतो. आस्था, आपुलकी, स्नेहपूर्ण वातावरणात होणाऱ्या या कार्यक्रमाची ओढ आपल्या सर्वांनाच असते.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोना संकटकाळात नागरिकांच्या जीवाचा धोका टाळण्यासाठी अनेक दशकांची सामुहिक दिवाळीची परंपरा यंदा खंडीत करावी लागत आहे. त्यामुळे इच्छा असूनही यंदा भेटता येणार नाही, याचे निश्चित दुःख आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करायचे असल्याने, कोरोनाला लवकरात लवकर हरवण्याचा निर्धार असल्याने आपल्याला यावर्षी एकत्र येता, भेटता येणार नाही, हे समजून घेतले पाहिजे. कोरोनाला हरवण्यासाठी आणखी काही काळ संयम आणि नियम पाळावे लागतील. त्यामुळे यंदाची दिवाळी आपण आपल्या घरी, नियमांचे पालन करुन सुरक्षित साजरी करत स्वत:सह  कुटुंबाला, समाजाला सुरक्षित ठेवू असे आवाहन या निवेदनात करण्यात आले आहे. 

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : कॉँग्रेसने ६० वर्षे देशाला बुडविले ; शिंदे

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

SCROLL FOR NEXT