baramati Sakal Media
पुणे

बारामतीत उद्यापासून अंशतः शिथीलता, बाजारपेठ मात्र बंदच

घरपोच सेवा सकाळी सात ते सांयकाळी सहापर्यंत सुरु राहतील.

मिलिंद संगई, बारामती.

बारामती : शहर व तालुक्यातील कोरोनाची सुधारणारी परिस्थिती पाहून बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी उद्यापासून बारामतीच्या लॉकडाऊनमध्ये अंशतः शिथीलता दिली आहे. बुधवारपासून (ता. 19) आरोग्यविषयक सेवा म्हणजेच दवाखाने, औषध दुकाने 24 तास सुरु राहतील. फळे, भाजीपाला, किराणा, गॅसवितरण, दुध वितरण, मान्सून पूर्व कामे, पाणी पुरवठा बाबत कामे, कृषी व कृषी संलग्न व्यवसाय, पशुखाद्य दुकाने सकाळी सात ते सकाळी अकरा वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत दिलेल्या आदेशातील इतर अत्यावश्यक सेवामध्ये केवळ घरपोच सेवा सकाळी सात ते संध्याकाळी सहा पर्यंत सुरु राहतील.

बँकीग सेवा सार्वजनिक व इतर सुट्या वगळता सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत सुरु राहणार आहेत. हॉटेल व रेस्टॉरंटना ग्राहकांना हॉटेलमध्ये बसवून सेवा देता येणार नाही मात्र त्यांना संध्याकाळी सहा वाजेपर्यंत घरपोच पार्सल सुविधेला परवानगी देण्यात आली आहे. वरिल सेवा वगळता इतर सर्व दुकाने राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे 1 जून पर्यंत बंदच राहणार आहेत असे दादासाहेब कांबळे यांनी स्पष्ट केले आहे. वृत्तपत्रांचे वितरण व माध्यमांच्या प्रतिनिधींना सवलत कायमच असेल इतर बाबी बंदच राहतील. लॉकडाऊनमध्ये काहीशी शिथीलता दिलेली असली तरी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त लोकांनी घराच्या बाहेर पडू नये, बँकांनीही आपल्या आवारात गर्दी होणार नाही या साठी पुरेशी काळजी घ्यावी असे आवाहन कांबळे यांनी केले आहे.

व्यापारी कमालीचे नाराज-गेल्या 43 दिवसांपासून दुकाने बंद असल्याने बारामतीचे व्यापारी कमालीचे नाराज आहेत. राज्य शासनाचा लॉकडाऊन 1 जून पर्यंत असल्याने बारामतीचे प्रशासन त्या बाबत काहीच करु शकत नाही. बारामतीची परिस्थिती निवळत असल्याने काही काळ तरी दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी अशी व्यापा-यांची मागणी आहे. राज्य शासनाने जिल्हाधिका-यांना या बाबत निर्णय घेण्याचे अधिकार द्यायला हवेत, जेथे परिस्थिती निवळते आहे, तेथे सवलत दिल्यास नुकसान कमी होऊ शकेल, अशी व्यापा-यांची भूमिका आहे. अजून दोन आठवडे दुकाने बंद ठेवणे न परवडणारे असून अनेक व्यापारी आता आर्थिक संकटात असल्याचे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराथी यांनी नमूद केले. शासनाने स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा अशी बारामतीच्या व्यापा-यांची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT