पुणे

मोठी स्वप्ने पाहावीत - हर्डीकर

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - आयुष्यात प्रत्येकाने मोठे स्वप्न पाहिले पाहिजे. भविष्याचा विचार करून आपल्या कल्पना बाजारपेठेत किती वर्षे टिकू शकतात, याचा विचार करून त्याला मूर्त स्वरूप द्यावे, तरच तुम्ही यशस्वी उद्योजक होऊ शकता, असा सल्ला महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला. येत्या काही दिवसांमध्ये महापालिकेतर्फे स्टार्टअप इन्क्‍युबेशन सेंटर सुरू केले जाईल. शहरातील स्टार्टअप्सना एका छताखाली सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना असल्याचे ते म्हणाले. 

नवोदित उद्योजकांना नवीन उद्योगाबाबत माहिती देण्यासाठी एक सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान, शहरात प्रथमच स्मार्ट स्टार्टअप अंतर्गत मोफत उद्योजकता शिबिर आयोजित केले आहे. त्याचे उद्‌घाटन हर्डीकर हस्ते झाले. चिंचवडमधल्या संभाजीनगरमधील रोटरी क्‍लबच्या हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमाला नगरसेविका अनुराधा गोरखे, ‘फ’ प्रभाग अध्यक्षा कमल घोलप, शिक्षण मंडळाच्या उपसभापती शर्मिला बाबर, नगरसेवक तुषार हिंगे, अमित गोरखे, महापालिकेचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, पुणे स्मार्ट स्टार्टअपचे रवी घाटे आदी उपस्थित होते. 

ज्ञानाचे क्षेत्र मोठे आहे. ज्ञान आत्मसात करून यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अपयशानंतर खचून जाऊ नये, दुसऱ्यावर आणि नशिबावर त्याचे खापर फोडू नये. स्टार्टअप संस्कृतीचा विकास पिंपरी चिंचवडमध्ये झालेला नाही. जनसहभागाच्या प्रयत्नांतून स्टार्टअपना आधारभूत सुविधा दिल्यास शहराचे नाव देशात उंच होईल, असे हर्डीकर म्हणाले. 

तरुणांनी नावीन्यपूर्ण संकल्पनांचा विचार करायला हवा. अनेक युवकांना आपल्या संकल्पनांना मूर्तस्वरूप देण्यात अडचण येत आहेत. त्यांच्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका स्मार्ट सिटी अंतर्गत एक उपक्रम हाती घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

कुठे आहे शिबिर...
एक सप्टेंबर ते तीस नोव्हेंबरदरम्यान निगडीतील नॉव्हेल इन्स्टिट्यूटमध्ये गुरुवारी व शुक्रवारी सायंकाळी पाच ते सात वाजेपर्यंत या उद्योजकता शिबिराचा लाभ तरुणांना घेता येणार आहे. नवीन उद्योगांबाबत तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nandigram Bypoll : पश्चिम बंगालमधील नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठा ट्विस्ट; ममता बॅनर्जींच्या उमेदवाराची अचानक माघार, नेमकं काय घडलं?

LP Gas Tanker Accident: वाडाखडकोना येथे एलपी गॅस टँकर कलंडला; गळती न झाल्याने मोठा अनर्थ टळला

Festival Makeup Skin Care: सणासुदीला मेकअपमुळे त्वचा बिघडतेय? १० मिनिटांत करा ‘हा’ घरगुती राइस जेल; चेहरा दिसेल फ्रेश

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Pali Stray Dogs: पालीत भटक्या कुत्र्यांचा कहर; १० वर्षांच्या चिमुरडीसह भाविक महिलेला चावा

SCROLL FOR NEXT