Fire Rohitra Mahavitaran esakal
पुणे

Rohitra Fire : मुख्य बाजारपेठेतील रोहित्राला मोठी आग; आगीत पूजेचं साहित्य, बांगडी विक्रेत्यांचं साहित्य जळून खाक

शहराच्या मुख्य बाजारपेठेतील महात्मा गांधी चौकातील महावितरणच्या रोहित्राला मोठी आग लागली होती.

प्रफुल्ल भंडारी

रोहित्रातील ऑईल गळून रस्त्यावर पडून वाहू लागल्याने त्यालाही आग लागली.

दौंड (पुणे) : शहराच्या मुख्य बाजारपेठेतील महात्मा गांधी चौकातील महावितरणच्या रोहित्राला मोठी आग लागली होती. तीन दिवसांपूर्वीच हे रोहित्र बदलण्यात आले. सकाळी रोहित्राचा स्फोट झाल्यानंतर आग लागून ती पसरली.

रोहित्रातील ऑईल गळून रस्त्यावर पडून वाहू लागल्याने त्यालाही आग लागली. रोहित्राच्या खाली पूजेचे साहित्य विक्री करणारे, बांगडी विक्रते व पटवेकरी बसतात. या आगीत पूजेचे साहित्य भस्मसात झाले. आगीचे आणि धुराचे लोट छत्रपती शिवाजी महाराज चौकातून दिसत होते.

नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक शाहू पाटील यांनी कुरकुंभ (ता. दौंड) एमआयडीसी व दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या अग्निशामक विभागाशी संपर्क साधून बंब बोलविले. ऑईल असल्याने बंबातील फोमचा मारा करून आगीवर नियंत्रण आणण्यात आले. दरम्यान, दौंड नगरपालिकेचा अग्निशामक बंब दुरूस्तीसाठी पाठविल्याने आग विझविण्यास दोन तासांचा विलंब झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

८० लाख पॅकेजची नोकरी AIमुळे गेली, IT इंजिनिअर पतीने आयुष्य संपवलं; शेवटची चिठ्ठी वाचून पत्नीनेही १८व्या मजल्यावरून मारली उडी

का झाला हृतिक रोशन- सुझान खानचा घटस्फोट? भाऊ जायेदने सांगितलं कारण, म्हणाला- हृतिकची गर्लफ्रेंड

Kurla Accident: कुर्ला बस दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट, आरोपी बेस्ट बसचालकला अखेर जामीन; हायकोर्टाचा निर्णय

Team India Schedule: भारतीय संघ व्यस्तच राहणार...! इंग्लंड दौऱ्यानंतर या देशात टी२० मालिका खेळणार; BCCI कडून घोषणा

आनंदी मालिकेच्या निमित्ताने स्टार प्रवाह वाहिनीचा अनोखा उपक्रम; सकाळ वृत्तपत्राच्या सहाय्याने केला ब्रेल जाहिरातीचा अनोखा प्रयोग

SCROLL FOR NEXT