पुणे

निवडणुका आल्या की, नेते शेताच्या बांधावर..आता कुठे गायब आहेत...?

नवनाथ भेके

निरगुडसर : निवडणुका आल्या की मगच राजकीय नेते शेताच्या बांधावर...आता कुठे झाले गायब...? गेल्या १५ दिवसांपासून पडत असत असलेल्या पावसामुळे लागवड केलेला बटाटा बियाणे सडले तर काढणीला आलेला बटाटाही सडला. विविध पिकांवरही पावसाचा परीणाम होऊ लागला असून, शेतीची कामेच ठप्प झाली आहेत. त्यामुळे आता वरुणराजा थांब की आता अशी म्हणण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे. तसेच मते मागणारे पुढारी, नेते आता गायब झाले आहेत.

आंबेगाव तालुक्यातील वळती, नागापुर, शिंगवे, रांजणी, जवळे, निरगुडसर परीसरात पावसाने गुरुवारी (ता. १७ रोजी) दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतपरिसर जलमय झाला. गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शेतीपिकातील कामे खोळंबली आहेत. त्याचबरोबर गेल्या १५ दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे थोरांदळे, नागापुर परीसरातील शेतात लावलेला बटाटा बियाणे सडूून दीड कोटींचे नुकसान झाले.

त्याचबरोबर बटाटयाचे आगार असलेली शेती म्हणजे सातगाव पठार या भागात सात ते आठ हजार एकर शेतावर हे पिक घेतले जाते. येथील नागरीकांचे वर्षभराची उपजिविका याच बटाटा पिकावर होते, परंतू ऐन शेवटच्या टप्प्यात पाऊस पडत राहील्याने काढणीला आलेला बटाटा सडला आहे. काढणीही करता येईना, भरमसाठ मजुरी देऊन बटाटा काढण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे. त्यामध्ये बटाटा मोठया प्रमाणात सडून नुकसान झाले.

गेल्या १५ दिवसांपासून पडत असलेला पाऊस अजुनही धो-धो पडत आहे. त्यामुळे शेती पिकातील सर्व कामे ठप्प झाली आहेत. तर घेतलेली अनेक पिके उध्वस्त झाली आहेत. तसेच आता शेतक-यांना नवीन पिकाची लागवड करायची आहे, परंतु पाऊस काही सुचू  देईना. मागील महीन्यात शेतक-याला 'ये रे ये रे पावसा' म्हणण्याची वेळ आली होती. परंतू सध्या पडत असलेल्या पावसामुळे नको नको पावसा म्हणण्याची वेळ आहे.

निवडणुका आल्या की... आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे व नागापुर परीसरातील शेतात लागवड केलेले बटाटा बियाणे सडले. तसेच सातगाव पठारावरील काढणी सुरु असलेला बटाटा सडला. यामुळे शेतक-यांचे कोटयावधी रुपयांचे नुकसान झाले. याकडे अदयाप कुणाला लक्ष देण्यास वेळ नाही. निवडणुका आल्या की राजकीय नेते शेताच्या बांधावर असतात. आता काय शेत दिसत नाही आता सध्या राजकीय नेते घरात बसले आहेत. कृषी विभागाच्या अधिका-यांना शेतावर यायला वेळ नाही. सर्वांकडे कोरोनाचे कारण आहे परंतु दिवसराञ राबणा-या बळीराजाकडे पाहणार तरी कोण असा प्रश्न उभा आहे. 

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: गणेशोत्सवाची आठवडाभर सुट्टी; मात्र गुजराती, कॉन्व्हेंट शाळांचा सुट्टी देण्यास नकार, शिक्षण विभागाचे कारवाईचे संकेत

'ठरलं तर मग' मालिका अर्जुन सुभेदार सोडणार? अमित भानुशाली पात्राबद्दल बोलताना म्हणाला, 'आता वेळ आलीय, मी आयुष्यभर...'

Weekly Horoscope September 2026 : सप्टेंबर १४ ते २० दरम्यान ‘या’ ५ राशींसाठी लॉटरी; नशिबाची जोरदार साथ मिळणार

Marathi News Live Updates : तिसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडीचा फटका; माणगाव-इंदापूर परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा

Amravati Jail news : आठवड्याभरात तिसऱ्या बंदीचा मृत्यू ;जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील घटनेमुळे खळबळ

SCROLL FOR NEXT