Pune-PMP-Bus
Pune-PMP-Bus 
पुणे

Pune Rain : महाकाय वडाचे झाड पीएमपीवर कोसळले; ड्रायव्हर गाडीतच अडकला!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बंद पडलेली पीएमपी बस घेऊन जाण्यासाठी आलेल्या 'पीएम सर्व्हिस व्हॅन' वर महाकाय वडाचे झाड कोसळून बस त्याखाली चिरडला. यामध्ये चालत गंभीर जखमी झाला असून, सुमारे दीड तासापासून बसमध्ये अडकून पडला आहे. झाड बाहेर काढण्यासाठी क्रेन मागविण्यात आली आहे. 

सायंकाळी मुसळधार पाऊस सुरू झालेला असताना टिळक रस्त्यावर पीएमपी बस बंद पडल्याची माहिती सर्व्हिस सेंटरला मिळाली. त्यामुळे स्वारगेटवरून ही बस टिळक रस्त्यावरून  जात होती. ही बस स. प. महाविद्यालय चौकात आल्यावर मुसळधार पाऊस व प्रचंड वाऱ्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेले वडाचे मोठे झाड बसवर कडकड कड असा आवाज करत कोसळले. त्यामध्ये चालक जागेवर अडकून पडला. त्यांना सुरूवातीला हालचाल करून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. तेथील नागरिक ही मदतीला धावले. अग्निशामक दलाला याची  माहिती मिळाल्या नंतर तेथे जवान पोहोंचले. मात्र हे झाड खुपच मोठे असल्याने त्यांनी हे झाड काढणे अशक्य  झाले. 

शेवटी झाड काढण्यासाठी क्रेन मागविण्यात आली आहे. पण वाहतूक कोंडीमुळे क्रेन आलेली नसल्याने चालक आतमध्ये अडकून पडला आहे. विजय नवगुणे असे या चालकाचे नाव आहे. त्याला वाचविण्यासाठी अग्निशमन दल सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण कार्तिकचा फिनिशिंग टच अन् बेंगळुरूने साधली विजयाची हॅट्ट्रीक

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT