nylon manja
nylon manja sakal
पुणे

Daund News : मांजाने गळा चिरल्याने दुचाकीचालकाचा मृत्यू

प्रफुल्ल भंडारी

दौंड शहरात पतंग उडविण्यासाठी वापरला जाणारा नायलॅान मांजाने भरचौकात गळा चिरल्याने एका दुचाकीचालकाचा मृत्यू झाला आहे.

दौंड - दौंड शहरात पतंग उडविण्यासाठी वापरला जाणारा नायलॅान मांजाने भरचौकात गळा चिरल्याने एका दुचाकीचालकाचा मृत्यू झाला आहे. बंदी असलेल्या नायलॅान मांज्याने हा बळी घेतला आहे.

पन्नालाल यादव (वय ४५, रा. पासलकर वस्ती, लिंगाळी, मूळ रा. गोरखपूर) असे मृत्यूमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे. दौंड शहरातील वर्दळीच्या नगर मोरी चौकातून पन्नालाल यादव हे एका सहकारी समवेत दुचाकीवरून जात असताना दुपारी हा प्रकार घडला. अचानकपणे समोर आलेल्या नायलॅान मांजाचा त्यांच्या गळ्याला फास पडला व रक्तस्त्राव सुरू झाला. नागरिकांनी त्यांना तत्काळ दौंड उप जिल्हा रूग्णालयात दाखल केले.

उप जिल्हा रूग्णालयातील डॅाक्टरांनी सुमारे १५ मिनिटे शर्थीचे प्रयत्न केले परंतु पन्नालाल यादव यांना ते वाचवू शकले नाहीत. मांज्यामुळे श्वासनलिका व रक्तवाहिन्या चिरल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याची माहिती रूग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॅा. दत्तात्रेय वाघमोडे यांनी दिली.

पन्नालाल यादव यांचे पार्थिव विच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. कंत्राटी पध्दतीने बांधकामाशी संबंधित कामे पन्नालाल यादव हे आपल्या सहकार्यांसमवेत घेत असत.

बंदी असतानाही दौंड शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर नायलॅान मांजाची विक्री सुरू आहे. नायलॅान मांजाची विक्री करणार्या किरकोळ विक्रेत्यांसह ठोक विक्रेते आणि पुरवठादारांवर देखील कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : आघाडीत आतापासूनच ‘तुपा’वरून भांडणे; पंतप्रधान मोदींची टीका

Loksabha Election 2024 : या आहेत सहाव्या टप्प्यातील प्रमुख लढती

Drinking Water : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

Sambit Patra : संबित पात्रांच्या विधानाचे पडसाद मतपेटीवर?

Kalyaninagar Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त

SCROLL FOR NEXT