पुणे

इंद्रायणी नदीला जैव कचर्‍याचे ग्रहण!

गणेश बोरुडे

तळेगाव : मावळसह देहू-आळंदीतील वारकर्‍यांची लोकमाता मानल्या जाणार्‍या इंद्रायणी नदीला जैविक कचर्‍याचे ग्रहण लागले आहे. मावळातील आंबी पुलाजवळ इंद्रायणीच्या मुख्य प्रवाहात धोकादायक जैववैद्यकीय कचरा टाकण्यात येत असल्याने पंचक्रोशीत रोगराईची भीती आहे.

आंबी-वराळे रस्त्यावरील पुलाशेजारी इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या मुख्य प्रवाहात अॅंटीबायोटिक, जुलाबाच्या गोळ्या, पेन किलर, मळमळ-उलटीच्या गोळ्या, मल्टिव्हिटॅमिनच्या गोळ्यांच्या शेकडो स्ट्रिप्स, तसेच भुलीच्या इंजेक्शनच्या बाटल्या, सुया, मलम, इतर मुदतबाह्य औषधे आणि खोक्यात भरलेला धोकादायक जैव वैद्यकीय कचरा जलपर्णीत अडकला होता. आंबी ग्रामपंचायतीचे सफाई कर्मचारी गोविंद शितकल यांच्या सोमवारी ही बाब लक्षात आली. त्यांनी हा कचरा तातडीने बाजूला करून उपसरपंच जितेंद्र घोजगे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.

झाल्या प्रकारामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्यावर अवलंबून गावांतील रहिवाशी आणि पशुधनाच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून,रोगराईची भीती व्यक्त केली जात आहे.जीवसृष्टीला धोकादायक जैविक कचर्याच्या विल्हेवाटीबाबत शहरी भागात कडक नियम असले तरी, ग्रामीण भागात मात्र यंत्रणा नसल्याने हा कचरा उघड्यावरच फेकला जातो.

कायद्यान्वये रुग्णालयांना नोंदणी करतानाच जैविक कचरा विल्हेवाटीबाबत उपाययोजना बंधनकारक आहे. जैव कचरा जास्तीत जास्त ४८ तासाच्या आत गोळा करून आधुनिक यंत्रणेच्या सहायाने त्याची सुरक्षित विल्हेवाट लावणे सक्तीचे आहे.

तळेगाव जनरल हाॅस्पीटल आवारातील लाईफ सिक्युर केंद्रात जैैैैव कचरा शुल्क आकारणी करुन खास वाहनाद्वारे संकलित करुन, त्याची योग्य विल्हेवाट लावली जाते.मात्र जागरुकतेअभावी अद्यापही ग्रामीण भागातील काही वैद्यकिय व्यावसायिक विल्हेवाटीचा किरकोळ पैसा वाचवण्यासाठी धोकादायक जैविक कचरा उघड्यावर अथवा नदी,नाल्यांत फेकत असल्याने तो मानवासह पशुधनाला धोकादायक ठरण्याची भीती आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाला यासंदर्भात कठोर कारवाईचे अधिकार असले,तरी त्यांनी मावळ तालुका वार्यावर  सोडल्यासारखी परिस्थिती आहे.यावर वेळीच ठोस उपाययोजना न केल्यास नदीकाठच्या गावांसह पाणीपुरवठा होणा-या लोकवस्तीला संसर्गजन्य आजारांना तोंड द्यावे लागणार आहे.

"परिसरातील जवळपास सर्वच वैद्यकिय व्यावसायिक सरकारमान्य जैविक कचरा विल्हेवाट केंद्राचे सदस्य असून,एकादिवसाआड संंकलीत करुन वर्गीकरणानंतर त्याची विल्हेवाट लावली जाते."
- सुहास मेडसिंगे, संचालक, लाईफ सिक्युर एटरप्रायजेस

"प्रदुषण नियंत्रण मंडळाने सदर जैविक कचर्याची तपासणी करुन,तो नदीत फेकणार्या दोषी वैद्यकिय व्यावसायिकांवर कारवाई करावी."
- जितेंद्र घोजगे, उपसरपंच, आंबी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT