पुणे

सावधान! आता पोलिसांकडे साडेसहा लाख गुन्हेगारांचा बायोमेट्रिक डेटा 

सकाळवृत्तसेवा

पुणे : राज्याच्या कानाकोपऱ्यांतील गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी आणि गुन्ह्यांची तत्काळ उकल होण्यासाठी 'ऑटोमेटेड मल्टिमॉडेल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टिम' (ऍम्बिस) या संगणक प्रणालीद्वारे साडेसहा लाख गुन्हेगारांचा बायोमेट्रिक डेटा जमा करण्यात आला आहे.

त्यामध्ये पुण्यातील अडीच लाख गुन्हेगारांच्या बोटांच्या ठशांसह अन्य महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांसह सर्व विभागांमध्ये या पद्धतीची माहिती जतन करण्यात येत आहे. 

गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहेत. त्यादृष्टीने राज्यातील सर्व पोलिस ठाणी, प्रशिक्षण केंद्र, अंगुलीमुद्रा केंद्र, परिक्षेत्रीय कार्यालय व मध्यवर्ती कारागृहांमध्ये 'ऍम्बिस' ही संगणक प्रणाली काही दिवसांपासून कार्यान्वित करण्यात आली आहे. 'ऍम्बिस'ची प्रकल्प समन्वयक कंपनी स्मार्टचिप इंडिया आहे. 'ऍम्बिस' पोलिसांच्या 'सीसीटीएन' प्रणालीशी संलग्न केली आहे.

त्यामध्ये आत्तापर्यंत राज्यातील साडेसहा लाख गुन्हेगारांची बायोमेट्रिक माहिती उपलब्ध केली आहे. यासाठी लागणारी सर्व उपकरणे पुण्यातील 30 पोलिस ठाण्यांना पोलिस आयुक्तालयातर्फे पुरविले आहेत. त्याचा उपयोग शहरातील उर्वरित गुन्हेगारांची माहिती घेण्यासाठी होत आहे. 

या माहितीचा समावेश 
'ऍम्बिस'मध्ये या गुन्हेगारांच्या बोटांचे ठसे, तळहाताचे ठसे, डोळ्यांची बुबुळे, डिजिटल प्रतिमा अशा दहा प्रकारच्या माहितीचा समावेश आहे. स्कॅनरद्वारे गोळा केलेला हा डेटा मुंबई येथील मुख्य डेटा सेंटरला जोडून तेथे जतन करण्यात येतो.

पोलिसांना असा होईल उपयोग 
पुण्यासह राज्याच्या कोणत्याही भागातील आरोपींची इत्यंभूत माहिती 'ऍम्बिस'द्वारे सहज उपलब्ध होऊ शकेल. आरोपीला पकडल्यानंतर त्याची माहिती पडताळून घेणे, त्याने कोणकोणते गुन्हे केले आहेत, यापूर्वी त्यास अटक झाली आहे का, शिक्षा झाली आहे का, याची माहिती तातडीने मिळू शकणार आहे. या पद्धतीमुळे पोलिसांना तपास वेगाने करण्यास मदत होणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India GDP Growth : भारताचा विकासदर सात टक्के राहील अर्थव्यवस्थेच्या लवचीकतेमुळे ‘मूडीज रेटिंग्ज’कडून अंदाजात सुधारणा

बाबो! प्राजक्ता माळीनं गोरेगावमधील फ्लॅट तब्बल 'इतक्या' कोटींना विकला; व्यवहारामागचं कारण अद्याप गुलदस्त्यात!

शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देणार : कृषिमंत्री भरणे; पीक कापणी प्रयोग पारदर्शकपणे करण्याचे निर्देश

Marathi News Live Updates : गणेशोत्सवानंतर चाकरमानी परतीच्या प्रवासाला; मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक संथ

Pune-Beed Railway : मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्र जोडणारी पुणे-बीड रेल्वे धावली; 22 सप्टेंबरपासून नियमित प्रवास सुरू, पाहा संपूर्ण वेळापत्रक आणि थांबे!

SCROLL FOR NEXT