पुणे

निसर्गातून जीवशास्त्र अभ्यासा : प्रा. घाणेकर

दत्ता म्हसकर

जुन्नर : वन्यजीव सप्ताह निमित्त वन्यजीवांचे सजीव सृष्टीतील महत्त्व या विषयावर लेखक प्रा. प्र. के. घाणेकर व माजी सैनिक रमेश खरमाळे यांनी पारुंडे ता. जुन्नर येथील श्री ब्रह्मनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जुन्नर वनपरीक्षेत्राने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

प्रा. घाणेकर म्हणाले, निसर्गातून जीवशास्त्राचा अभ्यास करा. पुस्तकापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने अभ्यास करता येतो. निसर्गात सहज उपलब्ध होणाऱ्या औषधी वनस्पतींची माहिती, निसर्ग संवर्धनाचे महत्त्व, तसेच निसर्गाच्या सानिध्यात आलेले विविध अनुभव त्यांनी यावेळी सांगितले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली. 

वनरक्षक खरमाळे म्हणाले, निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो म्हणून निसर्गाचे जतन करणे आपले कर्तव्य आहे. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षक तसेच वनविभागाचे कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन धनंजय राजुरकर यांनी केले. तारा डुंबरे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रिंकू सिंग 16 धावांवर बाद, कोलकाताचा अर्धा संघ परतला पॅव्हेलियनमध्ये

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT