KPG26B10941
बिपीन कोल्हे
‘संजीवनीचे’ मार्गक्रमण यशस्वी करू
बिपीन कोल्हे ः कोल्हे कारखान्यात लक्ष्मी पूजन उत्साहात
कोपरगाव, ता. ९ ः एल निनोच्या प्रभावाने यंदा दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे. ऊस उत्पादक सभासद शेतकरी बांधव आणि माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचा मूलमंत्र जपत ‘संजीवनी’चे मार्गक्रमण यशस्वी करू, असा विश्वास देत प्रत्येकाने आर्थिकसह पाण्याचे वर्षभराचे नियोजन करावे. शेतक-यांनी दहा गुंठे क्षेत्रात पंचवीस मेट्रिक टन उत्पादन घेण्याचा प्रयत्न करावा. दैनंदिन खर्चात काटकसर करा, सामाजिक भान ठेवा, वंचित घटकांना दुष्काळात मदत करा, तरच पुढची दिवाळी गोड होईल, असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केले.
सालाबादप्रमाणे याही वर्षी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे दीपावली सणानिमित्त कोल्हे यांच्या हस्ते लक्ष्मी पूजन पार पडले. त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. कार्यकारी संचालक हनुमंत करवर यांनी स्वागत केले. कारखान्याचे रोखपाल आर. टी. गवारे यांचा बक्षीस देवून सन्मान केला.
कोल्हे म्हणाले की, माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या दिशादर्शक नेतृत्वाखाली संजीवनीने अनेक संकटांचा यशस्वी मुकाबला केलेला आहे. साखरेच्या दरात तेजी आल्याने केंद्र व राज्य सरकारने थेट उसाच्या रसापासून इथेनॉल उत्पादन घेण्यावर बंदी आणली आहे. देशात सर्वप्रथम संजीवनीने बायो सीएनजी प्रकल्प सुरू केला. त्याच्यासमोर प्रेसमड व स्पेंटवॉशचा प्रश्न उभा राहिला आहे. दिवसेंदिवस एक एक नव-नवीन आव्हाने येत आहेत. गाळपातील समस्यांचे निराकरणासाठी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून उपाययोजना सुरू आहेत. अधिकारी, कामगारांनी देखील आपली जबाबदारी ओळखून कमीत कमी स्टॉपेजेस कसे होईल, यावर कटाक्ष ठेवावा. बॉयलिंग हाऊस सुधारणेतून आपण उसाचे गाळप सुरू ठेवले आहे. कारखान्याला लागणारी स्टीम ३८ वरून ३६ टनांवर कशी आणता येईल, याचेही नियोजन आपण दिले आहे. ग्रामीण अर्थकारणाची कामधेनू म्हणून कोल्हे कारखान्याचे मार्गक्रमण सुरू आहे. छोटी अडचण मोठी होऊ नये, यावर आपले अहोरात्र काम सुरू आहे. तालुक्यावर ज्या ज्या वेळी दुष्काळाचे संकट आले, त्याची तीव्रता कमी करण्यासाठी संजीवनी उद्योग समूहाने जबाबदारीने काम केले. मात्र त्यासाठी तुम्हा-आम्हा सर्वांची साथ महत्त्वाची आहे. काटकसरीचा मंत्र ठेवा तरच पुढचे धोके कमी होतील, असेही ते शेवटी म्हणाले.
याप्रसंगी संचालक, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, सचिव तुळशीराम कानवडे, कामगार, ऊस उत्पादक सभासद शेतकरी, ऊस वाहतूकदार आदी उपस्थित होते.
चौकट-
मदतीसाठी ६५ पोती धान्य जमा
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सत्कार न स्वीकारता मदत करा. आपल्या आवाहनाला सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यातून ६५ पोती धान्य जमा झाले आहे, असे कोल्हे यांनी यावेळी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.