पुणे

बिरगुंडी सोसायटीची निवडणूक बिनविरोध

CD

कळस, ता. १४ : बिरंगुडी (ता. इंदापूर) येथील बिरंगुडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये संस्थेच्या सर्व १३ जागांवरील उमेदवारांची बिनविरोध निवड झाली.
कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सरपंच गणेश सांगळे व संस्थेचे माजी अध्यक्ष सतीश सांगळे यांच्या दोन्ही गटांमध्ये समझोता करत संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध केली. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून संस्थेत निर्माण झालेले दोन गट व त्यांच्यातील अटीतटीचा वाद संपुष्टात आला आहे.
पोपट विठोबा सांगळे, तुकाराम नामदेव सांगळे, कृष्णा भाऊ सांगळे, मारुती नारायण सांगळे, अमोल रामदास खारतोडे, रामदास बबन सांगळे, शेखर भाऊ सांगळे, गणेश पोपट सांगळे यांची सर्वसाधारण मतदार संघातून, हौसाबाई नामदेव सांगळे, सविता सोमनाथ सांगळे यांची महिलांसाठी राखीव असलेल्या जागेवर, बापूराव अप्पा सांगळे यांची भ.ज./वि.ज./वि.मा.प्र. प्रवर्गातून, दीपक भागवत शिंदे यांची इतर मागास प्रवर्गातून, प्रमोद सुरेश लोंढे यांची अनु.जा.ज. प्रवर्गातून निवड झाली. अमर गायकवाड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: मद्यपाशातून मुक्तीसाठी ५० रुग्णालयांत जनजागृती स्टॉल

SCROLL FOR NEXT