bird-festival 
पुणे

नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ३१ जानेवारीपासून पक्षी महोत्सव

सकाळ वृत्तसेवा

पुणे - नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ‘पक्षी महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. येत्या ३१ जानेवारीपासून सुरू होणारा हा महोत्सव तीन दिवस पुण्यातील राजेंद्रनगर येथील इंद्रधनुष्य सभागृहात होणार आहे.

या महोत्सवाला राज्य वनविभागाचे साहाय्य लाभले आहे. स्लाइड शो, वन्यजीव चित्रपट महोत्सव, व्याख्याने, पक्षी निरीक्षण सत्रे असे विविध कार्यक्रम होणार आहेत. यात काही प्रसिद्ध वन्यजीव चित्रपटकारांचे पक्ष्यांवरील माहितीपट दाखवण्यात येणार आहेत. तसेच डॉ. सुरूची पांडे, डॉ. संजीव नलावडे यांसारखे पक्षितज्ज्ञ यावेळी पक्षी जगतातील काही बाबींवर आपल्या सादरीकरणातून प्रकाश टाकणार आहेत. 

विक्रम पोतदार, अक्षय खरे हे वन्यजीव छायाचित्रकार त्यांनी काढलेल्या पक्ष्यांच्या छायाचित्रांतून विविध भागातील पक्ष्यांची माहिती देणार आहेत. पक्ष्यांची कृत्रिम घरटी याविषयी विश्‍वजित नाईक यांची कार्यशाळा होणार आहे. तसेच सिंहगड व्हॅली येथे पक्षिनिरीक्षण सत्रही होणार आहे. म्हात्रे पुलाजवळील सचिन तेंडुलकर जॉगिंग पार्कसमोर असलेल्या इंद्रधनुष्य सभागृहात हा महोत्सव ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान होणार असून, हा सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT