accident sakal
पुणे

Accident News : कार-दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू; पाटस-दौंड अष्टविनायक मार्गावर झाला अपघात

अपघाता नंतर संतप्त जमावाने आॅडीकार पेटवुन दिली

अमर परदेशी

पाटस : पाटस-दौंड अष्टविनायक मार्गावर बिरोबावाडी (ता.दौंड) येथे कार गाडीची दुचाकीला धडक बसुन झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शनिवारी (ता.१४) सकाळी आठ वाजता ही घटना घडली. नेहाल अप्पा गावडे (वय २७) रा.बिरोबावाडी ता.दौंड जि.पुणे असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

तर कार चालक अविनाश घोलप रा.बिरोबावाडी ता.दौंड यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान,अपघाता नंतर संतप्त जमावाने आॅडीकार गाडीला पेटवुन दिले.यामध्ये कारचे पुर्णता नुकसान झाले. याबाबत प्रमोद वायाळ यांनी पोलिसात फिर्याद दिली.त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांनी माहीती दिली.

नेहाल गावडे हा तरुण बिरोबावाडी येथे राहत आहे. बिरोबावाडी हद्दीत सकाळी तो दुचाकीवरुन अष्टविनायक मार्गा ओलांडुन अलिकडे येत होता. त्यावेळी दौंडकडे जाणाऱया आॅडी कारची दुचाकीला जोराची धडक बसली. या अपघातात नेहालच्या डोक्याला जबर मार लागुन त्याच्या कानातुन रक्तस्त्राव होवू लागला.

नागरीकांनी गंभीर जखमी नेहालला उपचारासाठी पाठवुन दिले.मात्र,उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान,नेहाल हा आइ-वडीलांचा एकुलता एक मुलगा होता.तो इंजिनियर चे शिक्षण घेत होता. मृत्यू झाल्याचे समजताच संतप्त जमावाने आॅडी कारला आग लावली. काही वेळातच आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या कारचे मोठे नुकसान झाले. माहीती मिळताच यवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे,पोलिस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांच्यासह आदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT