पुणे

जन्म-मृत्यू दाखल्यांवरून अखेर जाग

CD

लोगो ः सकाळ इम्पॅक्ट

पुणे, ता. २५ : जन्म व मृत्यू दाखल्यांमधील दुरुस्तीची प्रक्रिया गेल्या महिनाभरापासून ठप्प झाल्याने हजारो नागरिकांची कामे रखडली आहेत. मात्र प्रशासन हातावर हात ठेवून शांत आहे. अखेर या विषयात स्थायी समितीने लक्ष घातले आहे. जन्म व मृत्यू दाखल्याच्या दुरुस्ती, नाव बदल यातील अडचणी सोडविण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात विशेष अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत हे अधिकारी नागरिकांच्या तक्रारी ऐकून मार्गदर्शन करणार आहेत.
जन्म-मृत्यू दाखल्यात दुरुस्ती करण्याचे अधिकार काढून घेतल्याने नागरिकांचे हाल होत असल्याचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रकाशित झाले होते. त्या पार्श्‍वभूमीवर आज (ता. २५) स्थायी समितीच्या बैठकीत हा विषय उपस्थित करण्यात आला.
जन्मतारीख, नाव, पालकांची नावे, लिंग अथवा अक्षरांमधील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी नागरिकांना अनेक दिवस हेलपाटे मारावे लागतात. सॉफ्टवेअरमधील तांत्रिक अडचणींमुळे मोठ्या प्रमाणात अर्ज प्रलंबित राहिल्याने शैक्षणिक प्रवेश, पासपोर्ट, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र तसेच विविध शासकीय कामांवर परिणाम झाला आहे. या संदर्भात अनेक तक्रारी दाखल केल्या, तरी त्यावर प्रशासनाकडून तोडगा काढला जात नाही. तसेच नागरिकांना व्यवस्थित माहिती दिली जात नाही.
स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले म्हणाले, ‘‘जन्म-मृत्यू दाखल्यातील दुरुस्तीचे काम होत नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रलंबित अर्जांची माहिती, सॉफ्टवेअरमधील त्रुटी, जुन्या नोंदींच्या डिजिटायझेशनची स्थिती आणि शासन स्तरावरील पाठपुराव्याचा अहवाल प्रशासनाने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ऑनलाइन अर्ज ट्रॅकिंग, अतिरिक्त मनुष्यबळ आणि विशेष मोहीम राबवून प्रकरणे निकाली काढण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.’’
दाखल्यांमधील दुरुस्तीचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळावेत यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असून, हा विषय विधिमंडळातही मांडला जाणार असल्याचे भिमाले यांनी स्पष्ट केले. नागरिकांना वेळेत सेवा मिळावी आणि भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: साखर झोपेत असताना भयंकर घडलं! ठाण्यात २५ वर्षे जुन्या सदनिकेचा काही भाग कोसळून दुर्घटना; २ जखमी

Pune Crop Insurance: पुणे जिल्ह्यात सुमारे ८३,००० शेतकऱ्यांनी काढला पीक विमा; २३८ कोटी रुपयांचे मिळणार पीक विमा सुरक्षा कवच

‘मला वाटलं मी मरणारच…’ कॅन्सरच्या निदानानंतरची ती भयानक रात्र सांगताना मनीषा कोईराला भावुक, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : चाकणमध्ये ५ ते ७ किमी वाहनांच्या लांबच लांब रांगा! खड्ड्यांमुळे चाकण महामार्गावर अपघात; २ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू, दोघे गंभीर

पुण्यातील बुधवार पेठेत सपना बिल्डिंगमध्ये पोलिसांचा छापा... समोर जे दिसलं ते धक्कादायक, २ जणांना अटक

SCROLL FOR NEXT