पुणे

आसू -मुधोजी महाविद्यालयात'' बिझफेस्ट २०२६'' या ''ट्रेड फेअर'' (व्यापार जत्रा) उपक्रम

CD

मुधोजी महाविद्यालयात ‘बिझफेस्ट २०२६’ उत्साहात

आसू, ता. २३ : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयात वाणिज्य विभाग, आयक्यूएसी आणि उद्योजकता कौशल्य विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (ता. १८) ‘बिझफेस्ट २०२६’ या ट्रेड फेअर (व्यापार जत्रा) उपक्रम उत्साहात झाला.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. पी. एच. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांमधील उद्योजकतेला चालना देणाऱ्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे उद्‌घाटन गोविंद मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि.चे व्यवस्थापक आणि महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डॉ. शांताराम गायकवाड यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयक्यूएसी समन्वयक प्रा. डॉ. टी. पी. शिंदे हे होते. वाणिज्य विभागप्रमुख प्रा. एल. सी. वेळेकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी फॅकल्टी इन्चार्ज प्रा. जे. पी. बोराटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. गायकवाड म्हणाले, ‘‘आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बाजाराचा, खरेदी-विक्रीचा आणि व्यवसाय व्यवस्थापन, वित्तीय व्यवस्थापन, गुणवत्ता व्यवस्थापन ग्राहक संबंध व्यवस्थापन, भांडवल उभारणी या कौशल्यांचा अनुभव मिळणे काळाची गरज आहे.’’
उपक्रमासाठी समन्वयक प्रा. एल. सी. वेळेकर, डॉ. पी. एच. शेट्ये आणि डॉ. एस. जी. निकम यांनी परिश्रम घेतले.
-----------------------------
02533
फलटण : डॉ. शांताराम गायकवाड यांचे स्वागत करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम व प्राध्यापक.
----------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय!उच्च जोखीम गर्भवतींसाठी ‘ॲनॉमली स्कॅन’ अनिवार्य; बालमृत्यू रोखण्यासाठी रुग्णालयांना आदेश!

‘Big Boss’मधून बाहेर पडताच सचिन कुमावतची पहिली पोस्ट; म्हणाला, “बिग बॉस मराठीच्या घरात जाणं म्हणजे…”

Explainer : पृथ्वी १६७० किमी प्रति तास वेगाने फिरते, मग आपल्याला हे जाणवत का नाही? विज्ञानाने उलगडलं नवं रहस्य, वाचा A टू Z माहिती

Latest Marathi News Live Update : अजितदादांची ती शेवटची भेट असेल असं वाटलं नव्हतं : मुख्यमंत्री फडणवीस

'अमराठी कलाकारांना पहिल्या रांगेत बसवतात आणि...' सई ताम्हणकरने इंडस्ट्रीबाबत व्यक्त केला राग, म्हणाली...'टीआरपी वाढवण्यासाठी...'

SCROLL FOR NEXT