पुणे

विंग विंगला भाजप उमेदवारांची प्रचारसभा डॉक्टर अतुल बाबा भोसले

CD

माजी मंत्र्यांना जमले नाही, ते वर्षात केले

आमदार डॉ. अतुल भोसले; विंग गटात भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा

विंग, ता. ३ ः केंद्रात व राज्यातही भाजप सत्तेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्रात, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे नेतृत्व करत आहे. राज्याबरोबरच प्रत्येक जिल्हा व तालुक्याची विकास केंद्र असलेल्या संस्थांवर भाजपचाच अध्यक्ष असला पाहिजे, त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी गट-गणातील उमेदवारांना विजयी करून जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवा, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांनी केले.
विंग जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार शैलजा शिंदे, विंग गणाच्या उमेदवार नंदाताई यादव, कोळे गणाचे उमेदवार अर्जुन कराळे यांच्या प्रचारार्थ येथील हनुमंत मंदिराच्या प्रांगणात आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. माजी आमदार आनंदराव पाटील, उद्याेजक आर. टी. स्वामी, कृष्णाचे संचालक श्रीरंग देसाई, सयाजीराव यादव, बबनराव शिंदे, शंकरराव खबाले, उपसरपंच सचिन पाचुपते, सुभाष पाटील, हंबीरराव यादव, राहुल गरुड, धनाजी पाटील, हेमंत पाटील, के. पी. यादव, राजेंद्र खबाले, महादेव पाटील, अजित खबाले, विलासराव यादव आदी उपस्थित होते.
आमदार डॉ. भोसले म्हणाले, ‘‘राज्य शासनाकडून केवळ विंगमध्ये ६ कोटींची विकासकामे केली आहेत. त्यात रस्त्यासाठी ९ कोटी ८० लाखांचा निधी दिला. पंचायत समितीच्या इमारतीसाठी १५ कोटी मंजूर केले आहेत. ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांच्या नावाने कुस्ती क्रीडा संकुलासाठी प्रयत्न सुरू आहेत. कऱ्हाड दक्षिण मतदारसंघात कोट्यवधी रुपयाचा निधी टाकून दळणवळण यंत्रणा प्राधान्याने सुरळीत करण्याचे प्रयत्न केले आहेत. जे माजी मंत्र्यांना जमले नाही, ते एका वर्षात करून दाखवले. आपण जे बोलतो तेच, करून दाखवतो. या निवडणुकीत भाजपकडून सुशिक्षित व सक्षम उमेदवार दिले आहेत. यापुढे त्यांच्या माध्यमातून विकास साधायचा आहे. यासाठी आपापसांतील मतभेद विसरून भाजपचे उमेदवार मताधिक्यांनी निवडून द्या.’’
माजी आमदार पाटील म्हणाले, ‘‘जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व पंचायत समितीचा सभापती हा भाजपचाच असेल, यासाठी प्रयत्न करा.’’ सचिन पाचुपते यांनी प्रास्ताविक केले. श्रीरंग देसाई, शंकरराव खबाले, उमेदवार शिंदे, यादव आदींनी मनोगत व्यक्त केले.

B02172
विंग : प्रचारसभेत बोलताना डॉ. अतुल भोसले. समाेर कार्यकर्ते व ग्रामस्थ. (विलास खबाले ः सकाळ छायाचित्रसेवा)
..................................................


-------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai demolition incident: बापरे! मुंबईत मोठी दुर्घटना टळली, नाहीतर... स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, काय घडलं?

Pension Scheme: NPS पेंशन योजनेतून पैसे काढताना या चुका करू नका; जाणून घ्या पैसे काढण्याचे सर्व नियम

Latest Marathi News Live Update : योग्य मोबदल्यासाठी मुक्ताईनगरमध्ये शेतकऱ्यांचे लोटांगण आंदोलन; इंदोर महामार्गावर वाहतूक ठप्प

Maharashtra State Government Loan : महाराष्ट्र राज्यावरील कर्जाचा डोंगर ११ लाख २ हजार ६५४ कोटींच्याही पुढे जाणार?

Karnataka Budget Protest : अर्थसंकल्पाविरोधात भाजपचे ‘खाली चंबू’ आंदोलन; सरकारवर कर्जबाजारीपणाचा आरोप, विधानसौधसमोरून काढला मोर्चा

SCROLL FOR NEXT