भाजपने सत्तेचे केंद्रीकरण केले ः हनुमंत पवार
मंगळवेढा ता. ४ : काँग्रेसने स्थानिक नेतृत्वाला सत्तेत वाटा मिळावा म्हणून पंचायतराज व्यवस्थेच्या माध्यमातून सत्तेचे विकेंद्रीकरण केले मात्र भारतीय जनता पार्टीने निवडणुका न घेता सत्तेचे केंद्रीकरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनी केला.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी राज्य सचिव अॅड. रविकिरण कोळेकर, तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, शहराध्यक्ष अॅड. राहुल घुले, प्रवीण गोवे, गणेश धोत्रे, संदीप फडतरे, प्रा. समाधान क्षीरसागर, रवींद्र शिवशरण आदी उपस्थित होते. पवार म्हणाले की, काँग्रेसने महिलांना सत्तेत वाटा मिळावा म्हणून ५० टक्के आरक्षण लागू केले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपरिषद, महानगरपालिका आदी ठिकाणी तीन लाख ७० हजार महिलांना प्रतिनिधित्व मिळाले. त्यामुळे महिला आपली भूमिका राजकारणातून प्रभावीपणे मांडून स्वतःचे अस्तित्व निर्माण करू लागल्या. मात्र, याचा काँग्रेसने कधीही गाजावाजा केला नाही. मात्र, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दीड हजार रुपये देऊन त्यांचे मत विकत घेऊन भाजपने गाजावाजा केला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नववर्षी निवडणुका न घेत भाजपने सत्तेचे केंद्रीकरण करून आपल्या हातात सत्ता ठेवण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख असतो. एखाद्या कॅबिनेट मंत्री हा त्या खात्याचा प्रमुख असला तरी देखील सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे घेतले. सत्ता वर घ्यायची हे बीजेपीचे तत्त्व आहे सत्ता खालीपर्यंत द्यायची हे काँग्रेसचे तत्त्व आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.