devendra fadnavis 
पुणे

BJP Convention: विधान परिषदेत मविआचे 'इतके' आमदार फोडले, कुणाला कळालंही नाही; फडणवीसांचा दावा

Devendra fadnavis BJP convention in pune: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यासपीठावरून बोलताना महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. विधान परिषदेतल मविआला दणका दिला, आता विधानसभेला महायुतीचेच सरकार आणू असं ते म्हणाले आहेत.

कार्तिक पुजारी

पुणे- भाजपचे आज पुण्यात अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे राज्यातील अनेक नेते अधिवेशनला उपस्थित आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यासपीठावरून बोलताना महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. विधान परिषदेतल मविआला दणका दिला, आता विधानसभेला महायुतीचेच सरकार आणू असं ते म्हणाले आहेत.

आता चातुर्मास सुरु होत आहे. चातुर्मास म्हणजे तपस्येचा काळ आहे. आपणाला याकाळात संपर्क वाढवायचा आहे. मी दाव्यानं सांगतो या विधानसभेनंतर राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार निवडून येईल. २०१४ मध्ये लोकांचा निर्धार पाहिला, २०१९ मध्ये लोकांचा पाठिंबा पाहिला, २०२४ मध्ये देखील लोक आपल्यासोबत असतील, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला आहे.

आपण चार गोष्टींसोबत लढत होतो. त्यात तीन पक्ष होते, त्यांची आपल्याला हरवायची शक्ती नव्हती. चौथा म्हणजे खोटा नेरेटिव्ह होता. त्याला उत्तर देण्यात आम्ही कमी पडतो. पण, त्याला उत्तर देण्याची आम्ही ताकद निर्माण करणार आहोत. आपला जो पराभव झाला आहे तो फक्त ०.३ टक्क्यांमुळे झाला आहे. ४३.६ टक्के आपल्याला आणि ४३. ९ टक्के मविआला मिळाले, असं फडणवीस म्हणाले.

आम्ही थोडं कमी पडलो, जो खोटा नेरेटिव्ह तयार झाला होता त्याला उत्तर देण्यात आम्ही कमी पडलो. खोट्या नेरेटिव्हला आम्ही थेट नॅरेटिव्हने उत्तर देणार आहोत. अटलजी यांनी आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मोदींनी आरक्षणाची मर्यादा वाढवली, त्यामुळे संविधानाला दिलेले आरक्षण सामान्य माणसाला मिळत आहे, असं फडणवीस म्हणाले.

महायुतीचे आमदार फुटतील असं म्हटलं जात होतं. पण, आम्ही टाचणी लावली. आमचा एकही आमदार फुटला नाही, पण तुमचे २० आमदार आमच्याकडे कधी आले हे देखील तुम्हाला कळाले नाही. हा फुगा फुटला आहे. आता तुम्हाला पुन्हा एकदा टाचणी लावायची आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL franchise sale Latest News : कुणी संघ विकत घेत का?, 'RCB' नंतर 'आयपीएल'मधील आणखी एक संघ विक्रिला!

Maharashtra Politics: पैशांच्या वाटपावरून वाद! बदलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

Ajit Pawar : “बारामतीप्रमाणे मंचरचा चेहरामोहरा बदलू”- अजित पवारांची घोषणा!

Viral Video: 'अरे भाई, तो माझा मित्र आहे...', रांचीमध्ये पोहचताच रोहित शर्माची सुरक्षारक्षकासोबत 'बिहारी स्टाईल' मस्करी

बापरे! अभिनेता शशांक केतकर बेपत्ता, सिद्धार्थ जाधव घेऊन फिरतोय मिसिंगचे पोस्टर, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT