Amit Shah Pune esakal
पुणे

Amit Shah Pune: उद्धव ठाकरे औरंगजेब फॅनक्लबचे प्रमुख; अमित शहांची बोचरी टीका! शिवसेनेला झोंबणार?

Amit Shah on Uddhav Thackeray: भाजपचे पुण्यातील अधिवेशन हे आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी आयोजित करण्यात आले होते. अमित शाहांच्या भाषणाने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आणि पुढील निवडणुकीसाठी जोमाने काम करण्याचे आवाहन केले.

Sandip Kapde

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे पुण्यात अधिवेशन आयोजित करण्यात आले. या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. अमित शाहांनी आपल्या भाषणात विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आणि उद्धव ठाकरेंवर टीका करताना त्यांना औरंगजेब फॅनक्लबचे प्रमुख असे संबोधले.

औरंगजेब फॅनक्लबचा उल्लेख-

अमित शाहांनी उद्धव ठाकरेंना औरंगजेब फॅनक्लबचा अध्यक्ष असल्याचा आरोप केला. त्यांनी विचारले की, "औरंगजेब फॅन क्लब राज्याला सुरक्षित ठेवू शकतो का?" यावरून शाहांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

मराठा आरक्षणावर भाष्य-

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अमित शाहांनी भाजप सरकारच्या कामगिरीचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, "जेव्हा जेव्हा राज्यात भाजपचे सरकार येते तेव्हा मराठा आरक्षण मिळते. परंतु, जेव्हा शरद पवार यांचे सरकार येते तेव्हा मराठा आरक्षण गायब होते." त्यांनी उदाहरण देत म्हटले की, "२०१४ ला आम्ही आरक्षण दिले, पण सरकार कुणाचे आले आणि आरक्षण गेले. आता पुन्हा आम्ही सत्तेत आलो आणि आरक्षण आले. त्यामुळे आरक्षणासाठी भाजपचे सरकार यायला हवे, अन्यथा आरक्षण गायब होईल."

शरद पवारांवर टीका-

अमित शाहांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, "सर्वात जास्त भ्रष्टाचारी कोण असेल तर ते शरद पवार आहेत. शरद पवार केंद्र आणि राज्यात 10 वर्ष सरकार होते, त्यावेळी महाराष्ट्रसाठी काय दिले ते त्यांनी सांगावे."

आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी-

भाजपचे पुण्यातील अधिवेशन हे आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी आयोजित करण्यात आले होते. अमित शाहांच्या भाषणाने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आणि पुढील निवडणुकीसाठी जोमाने काम करण्याचे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT