गणेश बीडकर Sakal
पुणे

पुण्यात भाजपला धक्का; गणेश बिडकर यांचे सभागृहनेते पद रद्द

भाजपने स्विकृत नगरसेवक गणेश बीडकर यांना देण्यात आलेले सभागृहनेते पद उच्च न्यायालयाने रद्द केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : भाजपने स्विकृत नगरसेवक गणेश बीडकर यांना देण्यात आलेले सभागृहनेते पद उच्च न्यायालयाने रद्द केले आहे. त्यामुळे महापालिकेची मुदत अवघ्या दोन आठवड्यात संपणार असताना हा भाजपला धक्का बसला आहे. दरम्यान, न्यायालयाचा लेखी आदेश आल्यानंतर याबाबत भाष्य केले जाईल असे बीडकर यांनी स्पष्ट केले. (Pune Corporation News)

गणेश बीडकर यांची महापालिकेच्या सभागृहनेते पदी निवड केल्याने याविरोधात काँग्रेसचे पुरस्कृत अक्षप नगरसेवक रविंद्र धंगेकर यांनी उच्च न्यायालयात मार्च २०२१ मध्ये याचिका दाखल केली होती. या न्यायमूर्ती ए.ए. सय्यद व एस. जी. दिघे यांच्या खंडपिठाने सप्टेंबर महिन्यात सुमारे २० तास याचिकवेर सुनावणी घेतली. तेव्हापासून याचा निर्णय प्रलंबित होता. त्यानंतर आज यावर सुनावणी झाली, अशी माहिती धंगेकर यांचे वकील कपील राठोड यांनी दिली.

स्विकृत नगरसेवकास सभागृहनेतेपद देता येत नाही, त्यामुळे बीडकर यांचे पद रद्द करावी आणि त्यांच्या काळात झालेले सर्व निर्णयही रद्द करावेत अशी मागणी केली होती. सुनावणीनंतर पद रद्द केल्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. याची आॅर्डर दोन दिवसानंतर निघणार आहे, त्यानंतर बीडकर यांना यावर सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी १० दिवसांची मुदत असेल, असे राठोड यांनी सांगितले. दरम्यान न्यायालयाची निकालाची प्रत आल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करू असे बिडकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी नेहा बोरा दाखल, विद्यार्थ्यांशी संवाद साधत जाणून घेतले प्रश्न

SCROLL FOR NEXT