भाजपच्या ११ नगरसेवकांचे नोटिसांना उत्तर
१८ जणांकडून खुलासा बाकी; सर्वांची उत्तरे आल्यानंतर प्रदेश कार्यालयाकडे अहवाल
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १५ ः ठाणे येथील भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला गैरहजर राहिल्याप्रकरणी नोटिसा बजावलेल्या महापालिकेतील २९ नगरसेवकांपैकी ११ नगरसेवकांनी पक्षाला आपला खुलासा सादर केला आहे. उर्वरित १८ नगरसेवकांकडून अद्याप उत्तर आलेले नाही. एक-दोन दिवसांत सर्वांची उत्तरे प्राप्त झाल्यानंतर त्यांचा अहवाल प्रदेश कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे.
भाजपच्या वतीने ६ व ७ सप्टेंबरला ठाणे येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील महापालिकांमधील नगरसेवकांसाठी निवासी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. सोलापूर महापालिकेतील ९४ नगरसेवकांपैकी पहिल्या दिवशी १९, तर दुसऱ्या दिवशी महापौरांसह ११ नगरसेवक गैरहजर राहिले होते. महापौरांना पूर्वपरवानगी असल्याने त्यांना वगळून २९ नगरसेवकांना नोटिसा बजावण्यात आल्या.
नोटिशीद्वारे गैरहजेरीचे कारण स्पष्ट करण्यास सांगण्यात आले होते. काही नगरसेवकांनी शिबिराला उपस्थित राहता येणार नसल्याची पूर्वसूचना पक्षाला दिल्याचेही समजते. आता प्राप्त झालेल्या खुलाशांची छाननी करून सर्व नगरसेवकांच्या उत्तरांसह अहवाल प्रदेश कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित नगरसेवकांच्या खुलाशांकडे पक्षाचे लक्ष लागले आहे.
कोट...
‘‘आतापर्यंत ११ नगरसेवकांनी नोटिशीला उत्तर दिले आहे. उर्वरित १८ नगरसेवकांची उत्तरे येणे बाकी आहे. एक-दोन दिवसांत सर्वांची उत्तरे प्राप्त झाल्यानंतर त्यांचा अहवाल प्रदेश कार्यालयाकडे पाठविण्यात येईल. त्यानंतर पुढील निर्णय प्रदेश पातळीवर घेतला जाईल.’’
- नरेंद्र काळे, पक्षनेते, भाजप, महापालिका, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.