पुणे

पक्ष कार्यालयात तुमचे पतीदेव चालतात

CD

‘पक्ष कार्यालयात तुमचे पती चालतात,
महापालिकेत आम्ही चालत नाही का?’

भाजप नगरसेविकांच्या पतींचा शहराध्यक्षांना थेट सवाल; पक्ष बैठकीत प्रवेशावरून हमरीतुमरी

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १६ : ‘पक्ष कार्यालयात तुमचे पती चालतात, महापालिकेत आम्ही चालत नाही का?’ असा थेट सवाल करत नगरसेविकांच्या पतींनी शहराध्यक्षांनाच धारेवर धरले. त्यावर ‘तुमच्या आमदारांना सांगा, बायकांना तिकीट नको, तुम्ही तिकीट घ्या; आम्हाला बोलू नका,’ असे शहराध्यक्षांनी सुनावले. ‘एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरा न्याय नको; सर्वांना समान नियम असावा,’ अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
नगरसेविका कल्पना कारभारी यांचे पती ज्ञानेश्वर कारभारी यांनी शहराध्यक्षांना थेट सवाल केल्याने भाजपच्या बैठकीत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अखेर सभागृहनेते नरेंद्र काळे यांच्या मदतीने नगरसेविकांचे पती, मुलगा आणि भाऊ या सर्वांनाच बाहेर काढण्यात आले.
महापालिकेची सर्वसाधारण सभा १८ ऑगस्ट रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता महापालिकेत पक्षाची बैठक झाली. या बैठकीत शहरातील सात जागा बीओटी तत्त्वावर देण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाला भाजपमधीलच ५० टक्के नगरसेवकांनी विरोध दर्शविला. या विषयावर गोंधळ होण्याची शक्यता असतानाच नगरसेविकांच्या पतींनी पक्षातील दुजाभावावर संताप व्यक्त केला. त्यावरून बैठकीत चांगलीच हमरीतुमरी झाली.
बैठकीच्या सुरुवातीलाच नगरसेविकांच्या पतींच्या उपस्थितीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावरून वातावरण तापले. ‘पक्ष कार्यालयात अनेक कारभारी फिरतात. आयुक्तांच्या बैठकीलाही काही सभापतींचे पती उपस्थित राहतात. ठराविक लोकांचे पती पक्ष कार्यालयात आणि महापालिकेत फिरतात, ते तुम्हाला चालते आणि आम्हाला मात्र वेगळा न्याय का? शहर उत्तरचे लोकच तुम्हाला टोचतात का?’ असा थेट सवाल ज्ञानेश्वर कारभारी यांनी केला. त्यामुळे बैठकीतील वातावरण आणखी तापले. महापालिकेतील कारभारात नगरसेविकांच्या पतींचा सहभाग, पक्ष कार्यालयातील त्यांची उपस्थिती आणि बैठकींमधील प्रवेशावरून पक्षांतर्गत नाराजी उघडपणे समोर आली.

चौकट...
बीओटीच्या सात जागांना विरोध
पक्षाच्या बैठकीत बीओटी तत्त्वावर देण्यात येणाऱ्या महापालिकेच्या सात जागांच्या प्रस्तावाला शहर उत्तर आणि ‘दक्षिण’मधील नगरसेवकांनी विरोध केल्याची माहिती आहे. महापालिकेच्या मालकीच्या जागा विकासकांना देण्यापूर्वी त्यांची संपूर्ण माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमोर ठेवावी, अशी मागणी करण्यात आली. महापालिकेच्या या सात जागा नेमक्या कुठे आहेत, त्यांचे क्षेत्रफळ किती आणि कोणत्या अटींवर त्या विकासासाठी देण्यात येणार आहेत, याची माहिती मागविण्यात आली. त्यामुळे पतींच्या उपस्थितीवरून सुरू झालेल्या वादाबरोबरच महापालिकेच्या मालमत्ता विकासाचा मुद्दाही पक्षाच्या बैठकीत तापला. दरम्यान, सातपैकी सात रस्ता आणि गोल्डफिंच येथील दोन जागा प्रायोगिक तत्त्वावर विकसित करण्यात येणार असून, उर्वरित जागा सभेसमोर ठेवण्यात येणार नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT