Devendra Fadnavis  esakal
पुणे

पुण्याचे पालकमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

सकाळ डिजिटल टीम

पुणे : राज्यात शिंदे फडणवीस सरकारच्या स्थापनेनंतर उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झालेले भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे पुण्याचे पालकमंत्री होणार असल्याच्या चर्चा रातकीय वर्तुळात मागच्या काही दिवसांपासून होत आहे, दरम्यान आज पुणे दौऱ्यात माध्यमांशी बोलताना ते पुण्याचे पालकमंत्री म्हणून येणार का? तसेच ते आगामी लोकसभेची निवडणू लढवणार का? या प्रश्नांची थेट उत्तरं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहेत. पुण्यात इलेक्ट्रीक इ-मोबिलीटीच्या बसेसच्या उद्घाटनानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

तुम्ही पुण्याचे पालकमंत्री म्हणून येणार आहेत, तसेच लोकसभा लढवणार अशी चर्चा आहे यावर पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी पुण्याला पालकमंत्री म्हणून येणार नाही, मी लोकसभा लढवावी अशी तुमची का इच्छा आहे, मी तुम्हाला महाराष्ट्रात नको आहे का? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या भेट झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती मात्र, आता या भेटीबाबत खुद्द देवेंद्र फडणवीसांनी अशोक चव्हाण यांच्यासोबत भेट झाल्यांच्या चर्चांना विराम दिला आहे. त्यांच्याशी अशी कुठलीही भेट झाली नाही असेही फडणवीसांनी यावेळी सांगितले. तसेच मंत्री मंडळाच्या विस्तरा बाबत विचारले असता, मंत्री मंडळ विस्तार लवकरच होईल असेही ते म्हणाले.

पुण्यात माध्यमांशी बोलताना पीएमपीएल १५० इलेक्ट्रीक इ मोबिलीटीच्या बसेस आणि चार्जींग स्टेशनचं उद्घाटन आज केल्याचे फडणवीस यांनी सांगितले. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री महेंद्रनाथ पांडे, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हर्च्युअली या उद्घाटनाला उपस्थित होते, पुणे हे पहिलं शहर झालं पाहिजे जेथे शंभर टक्के अपारंपारिक स्त्रोतांतून मोबिलीटी करता आली पाहिजे. ६५० बसेस झाल्यानंतर पुणे देशामध्ये आग्रणी होणार आहे, असे देखील फडणवीसांनी यावेळी सांगितलं.

पुणे शहराचं विभाजन करून नवीन महापालिका झाली पाहिजे का? यावर बोलताना फडणवीस म्हणाले की नवीन वादाचे विषय कशाला काढता जेव्हा करायचं तेव्हा पाहू. सध्या राज्य सरकारसमोर असा प्रस्ताव नाही, भविष्यात येऊ शकतो असे सांगत फडणवीसांनी या विषयावर बोलणे टाळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I : वैभव सूर्यवंशीचे पदार्पण नाहीच, संजू सॅमसन संघात कायम; पहिल्या ट्वेंटी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन

अभिनेत्रीसोबत भररस्त्यात गैरवर्तन; बहिणीसमोरच अनोळखी व्यक्तीचं लाजिरवाणं कृत्य, अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

T20 Series : वैभव सूर्यवंशीचं आज पदार्पण? कुणाला बाहेर बसवणार? इंग्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना, भारताची परीक्षा

SCROLL FOR NEXT